Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


सुरज चव्हाण बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता...

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल )  कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी 5 व्या सिझन चा ग्रँड फिनाले आज पार पडला. यावेळी या सिजन चा गुलीगत फेम सुरज चव्हाण विजेता ठरला. 
    तर अभिजित सावंत उपविजेता ठरला. यंदाच्या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी 'बिग बॉस' 5 च्या चक्रव्यूहात सहभाग घेतला होता. या सर्वात बाजी मारत सुरज चव्हाण अखेर विजेता ठरला.
या वेळी बिग बॉस मराठी कडून सुरज चव्हाण यास 14 लाख रुपयाचा धनादेश, 10 लाख रु.ज्वेलरी खरेदी साठी व्हावचर देण्यात आले तर एक इलेक्ट्रिक बाईक ही देण्यात आली. रितेश देशमुख ने होस्टिंग ची जबाबदारी सांभाळली.
   वर्षा उसगांवकर,पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, योगिता चव्हाण, वैभव चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत,  घन:श्याम दरवडे, अरबाज पटेल,  पुरुषोत्तमदादा पाटील, इरिना रूडाकोवा, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण यांच्यामुळे 'बिग बॉस' चा 5 वा सिझन चांगलाच रंगला.

सुरज चव्हाण हा एक सोशल मीडिया इनफ्लून्सर आहे. तो सुरवातीला टिकटॉक या अँप वर प्रचंड प्रसिद्ध होता. भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर इंस्टाग्राम आणि यु ट्यूब शॉर्ट्स च्या माध्यमातून रीलस्टार म्हणून पुन्हा प्रकाशझोतात आला. त्याची प्रचंड फॅन फोल्लोविंग असल्याची दिसून येते. इन्स्टाग्राम वर 1.3 मिलीयन (13 लाख ) फोल्लोवर्स आहेत. तो सध्या रील्स सोबत शॉर्ट फिल्म आणि चित्रपटात देखील काम करत आहे. त्याच्या प्रचंड प्रसिद्धीमुळे त्याला मराठी बिगबॉस सिझन 5 मध्ये संधी मिळाली आहे. बिगबॉस मध्येदेखील त्याने आपल्या साध्या जीवनशैलीने आणि स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि मराठी बिग बॉस ची ट्रॉफी सुद्धा जिंकली
    सुरजचा जन्म 1994 साली बारामती तालुक्यातील मोडवे या गावी रामोशी समाजातील कुटुंबात झाला. सध्या सुरज याच गावात स्थायिक आहे. सुरज लहान असतानाच त्याचे वडील कॅन्सरने (कर्करोग) झाले. तसेच आईचे देखील आजारपणामुळे निधन झाले. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्याने त्याचा सांभाळ त्याच्या बहिणींनी केला. सुरजला 5 मोठ्या बहिणी आहेत. त्यांनीच त्याला लहानाचे मोठे केले. तो श्री खंडोबाला वडील मानतो तर मरिमाता या त्याच्या कुलदेवीला आई मानतो.
Advt.
 
      लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे सुरजची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. घर चालवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. यासाठी तो मजुरीने कामावर जात. त्याला दिवसाला 300 रु. मजुरी मिळत असे. यातच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. अशा परिस्थितीमुळे सुरजला त्याचे शालेय शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. त्याचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सुरज अत्यंत हलाखीचे दिवस अनुभवले आहेत. पण कितीही संकटे आले तरी सुरजने खचून न जाता हसत हसत सर्व परिस्थितीचा सामना केला.
Advt.
     परिस्थितीशी झगडत असताना सुरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉकची माहिती मिळाली आणि सुरजने टिकटॉकवर इतर कोणाच्यातरी मोबाईल वरून पहिला व्हिडिओ बनविला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. हे त्याला समजल्यानंतर त्याने मजुरी करून मिळालेल्या पैशातून एक मोबाईल घेतला आणि स्वतःची टिकटॉक आयडी काढुन व्हिडिओ बनवू लागला. बघता बघता सुरज त्याच्या हटके स्टाईलने टिकटॉक वर तो प्रचंड प्रसिद्ध होत गेला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि सुरज टिकटॉक स्टार झाला.
टिकटॉक वरती बंदी आणल्यानंतर सुरजने तिथेच हार न मानता आपले नशीब इंस्टाग्राम व यूट्यूब वरती आजमावयाला सुरुवात केली. आधीच फेमस असलेल्या सुरजला इंस्टाग्राम व यूट्यूब वरती देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला. तो सतत त्याच्या शैलीत नवनवीन डायलॉग घेऊन येत असतो. ते प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्याचे डायलॉग लहान लहान मुलांच्या तोंडात सहज ऐकायला मिळतात. त्याच्या डायलॉग चे टी शर्ट सुद्धा बाजारात विकायला येऊ लागलेत.त्यापैकी बुक्कीत टेंगुळ, गोलीगत धोका, झापुक झुपुक असे त्याचे प्रसिद्ध असे डायलॉग प्रसिद्ध आहेत. 
Advt.
      त्याने आपल्या व्हिडिओ ने प्रेक्षकांचे मनोरंजन करून स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आज त्याचे इंस्टाग्राम व यूट्यूब वरती लाखो फोल्लोवर्स आहेत.
      गोलीगत सुरजने शून्यातून त्याचे विश्व निर्माण केले आहे. आपल्या सर्वांसाठी त्याचे जीवन खूप प्रेरणादायी आहे. कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड मनात न बाळगता आपल्या कामावर प्रेम करुन ते सातत्यपूर्ण करत राहिल्याने यश हे मिळतेच त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोलीगत सुरज चव्हाण.. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement