Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


चव्हाण सेंटरच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद - २०२५ चे आयोजन...

चव्हाण सेंटरच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद - २०२५ चे आयोजन...


मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल - दि.६ फेब्रुवारी : दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी “दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद” यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होत असून या परिषदेस त्या उपस्थित राहणार आहेत. ही परिषद शुक्रवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे. 

या परिषदेचे उद्दिष्ट दिव्यांगांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित धोरणे, कायदे आणि योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि चर्चा करणे आहे. कल्याणकारी योजनांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रक्रिया सुलभ करणे, सेवा वितरणात सुधारणा करणे आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये आपली बाजू मांडणे हे या परिषदेचे प्रमुख विषय आहेत. 

या परिषदेत महाराष्ट्र शासनातील विविध विभागातील अधिकारी, शाळा, आरोग्य, रुग्णालय, शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, दिव्यांगांसाठी संस्था, संघटना सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम मोफत असून पूर्वनोंदणीसाठी गुगल फॉर्म https://chavancentre.org/ वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ९८६७१ ५५३४५ या नंबरवर संपर्क करू शकता. या परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे  आवाहन चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement