Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


ट्रिप लघुपटाचे स्क्रिनिंग संपन्न..




                   ट्रिप लघुपटाचे स्क्रिनिंग संपन्न..

मुंबई -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल - दि ९ - अश्वि एंटरटेनमेंट, मुंबई प्रस्तुत ट्रिप लघुपटाचा लॉंचिंग सोहळा मुंबईत रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.... 
     जीवन जगत असताना अनेक घटनाचा आपल्या मनावर कळत नकळत परिणाम होत असतो. तसेच योग्य वेळी व्यक्त होन्याला फार महत्व असते... तान तणाव दूर करण्याची क्षमता असते केवळ मैत्रीत, माणसाला असलेल्या सर्व प्रॉब्लेम चे सोल्युशन असते ती मैत्री व मित्र परिवार असा आशय असलेल्या या लघुपटाची  निर्मिती बबन चव्हाण यांनी केली आहे.
 ट्रिप या लघुपटाचे स्क्रिनिंग प्रमुख मान्यवर, कलाकार, तंत्रज्ञ् यांचे उपस्थितीत करण्यात आले, या वेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले... 
     यावेळी उपस्थित सर्वांनीच ट्रिप लघुपटाचे कौतुक केले. 
यावेळी नाट्यसमीक्षक सु. बा सरपडवळ, संगीतकार  सुभाष घोडके, पत्रकार विकास पवार,        अभिनेता संजय डुबल, लेखक कवी, गीतकार गायक विजय कांबळे, जगदीश वासावे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

'ट्रीप' या लघुपटाची  निर्मिती बबन चव्हाण यांनी केली असून, कथा, पटकथा, संवाद, गीतकार व गायक -  विजय कांबळे , कॅमेरामन व प्रमुख मार्गदर्शन - संजय डुबल, मिक्स मास्टर..संगीत- दर्शन खार,  संकलन आशु जाधव, आदी नी केले.
      तर या लघुपटात सागर कांबळे,  बबन चव्हाण, कोमल चव्हाण, सुवर्णा ढमाल,  वर्षा सावंत, रामदास मोहिते,  सुनील सुर्वे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून यात 
सह कलाकार म्हणून दिपक दवंडे, सुनीता मोहिते, रश्मी धोपट, संजय जाधव,शिवाजी पिंपळे आदींनी भूमिका साकारल्या आहेत.
 बबन चव्हाण यांची ट्रिप ची निर्मिती  प्रयत्न पूर्वक वाटली, या वेळी
विठ्ठल शेळके, विजय देसाई, दिनेश जाधव, संतोष लाड, सत्यवान पवार , अजित कदम, सुजाता सावडेकर, निशा बल्लाळ, वर्षा कांबळे, सुरेश कुराडे, राहुल मोरे, धोडिबा मोहिते, सूर्यकांत ठाकूर, विठ्ठल यादव आदी मान्यवर उपस्थित होते
 मुंबई, सातारा, पुणे, कोयना नगर येथून शुभेच्छा देण्यासाठी मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती, या वेळी संपन्न झालेल्या मनोरंजन कार्यक्रमात गायिका वर्षा सावंत व गायक विजय कांबळे यांनी सुमधुर गायनाने उपस्थित सर्वाना मंत्रमुग्ध केले, 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन  संजय डुबल यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement