गोरेगाव मध्ये २६ सप्टेंबरपासून एक्युप्रेशर प्रशिक्षण शिबिर...
मुंबई : आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - : केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने गोरेगाव पश्चिम येथे ऍक्युप्रेशर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २६ सप्टेंबर २०२६ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, दररोज सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे प्रशिक्षण शिबिर केशव गोरे स्मारक ट्रस्ट, पहिला मजला, आरे रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे. इच्छुक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अॅक्युप्रेशरच्या प्राथमिक तंत्रांची माहिती आणि त्यांचा योग्य पद्धतीने वापर याबाबत प्रशिक्षण या शिबिरात दिले जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून कळविण्यात आले आहे.
केशव गोरे स्मारक ट्रस्ट गोरेगाव पश्चिम येथे विविध सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवत असतात.
📍 स्थळ : केशव गोरे स्मारक ट्रस्ट, पहिला मजला, आरे रोड, गोरेगाव (प.)
📅 कालावधी : २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ : सायंकाळी ७ ते ९
📌 उपक्रम : अॅक्युप्रेशर प्रशिक्षण शिबिर
अधिक माहिती साठी 8369465759, 8850039248 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे...
**इच्छुकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.**


0 टिप्पण्या