Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबई:आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह- (संजय डुबल) दि. 27 नवी दिल्लीत आज जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
     मनोरंजन क्षेत्रातील कामगिरी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
   राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींनी अशोक सराफ यांच्या सह ६८ दिग्गजांना पुरस्कार प्रदान केले. 
  या सोहळ्यासाठी अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ, भाऊ सुभाष सराफ उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement