Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मुंबई मराठी पत्रकार संघाचा ८२ वा वर्धापन दिन संपन्न यावेळी मान्यवर पत्रकारांना पुरस्काराने गौरवण्यात आले...

         शिरीष कणेकर व पुरस्कार विजेता नंदकुमार पाटील

मुंबई - संजय डुबल - मुंबई मराठी पत्रकार संघाचा यंदाचा पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती शोधपत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार शर्मिला कलगुटकर यांना,  ज्येष्ठ मुद्रित शोधक श्रीकांत नाईक यांना कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार, सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार नंदकुमार पाटील यांना,  तोलाराम कुकरेजा वृत्तपत्र छायाचित्रका पुरस्कार दै. सामनाचे ज्येष्ठ छायाचित्रकार सचिन कमलाकर वैद्य यांना तर  ‘युगारंभ’कार सर्वोदयी कार्यकर्ते मधूसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक अनिकेत जोशी आदींना प्रमुख मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

  २१  जून, २०२३ रोजी पत्रकार संघाचा ८२ वा वर्धापन दिन, पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे साजरा करण्यात आला, यावेळी मान्यवर पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, 
    या कार्यक्रमासाठी प्रवक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि शैलीदार लेखक शिरीष कणेकर हे उपस्थित होते. त्यांनी आपले पत्रकारीतेचे अनेक अनुभव आपल्या खास शैलीत सर्वांसमोर मांडले. या वेळी त्यांची प्रकट मुलाखातही घेण्यात आली.
अभिनेत्री - निता दिवेकर, नंदकुमार पाटील आणि नाटककार - सु. बा. सरपडवळ पाटील यांचे अभिनंदन करताना.
      या वेळी ६५ वर्षावरील माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. तर पत्रकार संघाचे कार्यास भविष्यात मधुर फळे यावीत व पत्रकार  संघाचे कार्य वृक्षांसारखेच बहरावे यासाठी पत्रकार संघाचे सर्व माजी अध्यक्ष यांचे उपस्थितीत प्रत्येकाचे नावे मुंबई मराठी पत्रकार संघाचे आवारात वृक्षलागवड करण्यात आली.  
 या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी संचालक तसेच सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. 

         सत्कार सोहळ्याचा आनंद व्यक्त              करताना नंदकुमार पाटील

छायाचित्रे सु. बा. सरपडवळ यांनी काढली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement