Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


सर्वोत्कृष्ट "नाट्य मल्हार" !

.           " सर्वोत्कृष्ट "नाट्य मल्हार" !

              लक्षवेधी *रंगभूमीवरून.....
              मुंबई-   नुकताच नाट्यव्यवसायिक "मराठी नाट्य निर्माता संघ" या संघटनेचा ५४ वा वर्धापन दिन दादरच्या शिवाजी नाट्य मंदिरात सप्तसुरांच्या नाट्यमयगीत अभिनय मिश्रित योगधारेने नाट्य रसिकांच्या हाऊसफुल्ल गर्दीत आणि दर्दी रसिक जनांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा *"नाट्य मल्हार"* सोहळा श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) दादर मुंबई या संस्थेच्या संयोगाने गुरुवार दिनांक २२जून २०२३ रोजी संध्याकाळी सात वाजता मोठ्या दिमागात साजरा झाला! तेव्हा 'नाट्य मल्हार' या अनोख्या
प्रेमानंद गज्वी, अशोक सराफ, उषा मंगेशकर व अन्य मान्यवर 
           सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'भारतरत्न लता मंगेशकर' यांच्या तैल चित्राची तस्वीर शिवाजी नाट्य मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरील छत्रपतींच्या चित्राजवळ अनावरण 
 भारतरत्न लता मंगेशकर यांचे तैलचित्राचे अनावरन करताना मान्यवर

करण्यात आले, तर 'नटवर्य गोपीनाथ सावकार' यांचे तैलचित्र पहिल्या मजऱ्यावरील नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारासमोरच अनावरण करण्यात आले तेव्हा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उषा मंगेशकर यांनी 'लता मंगेशकर' आणि 'गोपीनाथ सावकार' या दोन्ही महान व्यक्तींच्या चित्राचे अनावरण केले.
         
तेव्हा रंगमंचावर नाट्य संमेलना अध्यक्ष- प्रेमानंद गज्वी, अभिनेता अशोक सराफ, शेखर दाते, उषा मंगेशकर, ज्ञानेश महाराव, संतोष काणेकर, राहुल भंडारे, दिनू पेडणेकर, प्रदीप कबरे, शिवाजी मंदिरचे अण्णासाहेब सावंत, सुभाष सराफ तसेच संगीत गायनातील कलावंत- मानसी जोशी, शुभांगी सदावर्ते, विक्रांत आजगावकर, संतोष पवार, ओमकार भोजने, भाऊ कदम, संजीवनी जाधव, नयना आपटे व ज्ञानेश महाराव आणि सविता मालपेकर यांनी विविध कलेत भाग घेऊन नाट्यगृहातील रसिकांना, खिळवून ठेवले होते !     
तर  नाट्य निर्माते- उदय धुरत, अरुण होर्णेकर, रणजीत मसुरेकर, जनार्दन लवंगारे, आणि आनंद म्हसवेकर, या जेष्ठ निर्मात्यांना कृतघ्नता सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कारपूर्वक गौरवण्यात आले ! सदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - मधुरा प्रभू यांनी आपल्या स्वर मधुर शब्दांनी रसिकांची मन जिंकली. 
नटवर्य गोपीनाथ सावकार' यांचे तैलचित्रास अभिवादन करताना पत्रकार सु. बा. सरपडवळ

लेखन  -  सु बा सरपडवळ ( पत्रकार / नाट्य समीक्षक)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement