Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


समर्थ सोशल फौंडेशन चे राज्यस्तरीय व्यसनमुक्तीदुत मधुमेहमुक्तीदुत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न्...आगामी काळात व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती अभियान महाराष्ट्रच नव्हे तर भारतात व विदेशात पोहोचवण्यासाठी सामुदायिकपणे काम करण्याचा निर्धार - संस्थापक- सादिक शेख

समर्थ सोशल फौंडेशन चे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व  मधुमेहमुक्ती दुत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न्...

आगामी काळात व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती अभियान महाराष्ट्रच नव्हे तर भारतात व विदेशात  पोहोचवण्यासाठी सामुदायिकपणे काम करण्याचा निर्धार - संस्थापक- सादिक शेख

                    पुरस्कार विजेते

कोल्हापूर - संजय डुबल : समर्थ सोशल फाउंडेशन, न्यूट्रीफील हेल्थ प्रो. प्रा. लि., शिवशंभु व्यसनमुक्ती केंद्र, कोल्हापूर अंतर्गत दि २५ जुन 2023 रोजी कोल्हापुर येथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्तीदुत हा पुरस्कार सोहळा संपन्न् झाला, संस्थेचे १६ हजार पि.आर. ओ. व विस्तार अधिकारी देशभर कार्यरत असुन पैकी मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५१ पी. आर.ओ. व  विस्तार अधिकारी यांना स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानपुर्वक प्रमुख उपस्थित मान्यवरांचे हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सदर पुरस्कार स्विकारण्यास पी. आर. ओ. व विस्तार अधिकारी सहकुटुंब उपस्थित होते. 

                  पुरस्कार विजेते

    समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने, मागील सात वर्षे व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती अभियान देशपातळीवर राबवले जाते, यासाठी  संपूर्ण महाराष्ट्रा बरोबरच अनेक राज्यांत व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती साठी मार्गदर्शनपर काम सुरू आहे, संस्थेच्या माध्यमातुन आता पर्यंत ५  लाख पेक्षा ज्यास्त लोकांना व्यसनमुक्त होण्यासाठी फायदा झाला आहे  तसेच ३ लाख पेक्षा ज्यास्त मधुमेहाच्या त्रासातून बाहेर येण्यास संस्थेने मदत केली आहे, पर्यायाने व्यसनामुळे व मधुमेहाच्या त्रासातुन उध्वस्त होणारी कुटुंब वाचवण्याचे काम आपल्या हातुन झालेले आहे. तेवढ्या सर्व कुटुंबांचे आशिर्वाद संस्थेतील सर्वांच्या सोबत आहेत, संस्था केवळ व्यसनमुक्तीचे कार्य करत नसुन व्यसनी व्यक्तीचे पुनर्वसन करण्याचे व त्यास स्वताचे पायावर उभे करण्याचे  महत्वपुर्ण कार्य ही करते, अनेकांनी व्यसनमुक्ती चे कार्य सुरू करुन पुरस्कार देखिल मिळवले आहेत. व या माध्यमातुन त्यांना स्वयंरोजगार मिळत असल्याचे मनोगत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी व्यक्त केले, ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र आणि भारतासह देश विदेशात मधुमेहमुक्ती आणि व्यसनमुक्तीचं काम मोठ्या प्रमाणावर पोहोचवायचे आहे. हे काम अव्ह्यातपणे सुरू ठेवण्यासाठी समर्थ सोशल फौंडेशन कटिबद्ध आहे. यासाठी समर्थ सोशल फौंडेशन च्या टिम ने सामुहीक काम करून आपले अभियान देश विदेशात पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया  व येत्या ह्या वर्ष भरात ५ लाख व्यक्तींना व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.  

              पुरस्कार विजेत्या महिला 

     पुरस्कार वितरण सोहळ्याच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कराडचे नायब तहसीलदार विजय माने साहेब होते. यावेळी पीएनबी मेटलाइफ कोल्हापूरचे शाखा व्यवस्थापक नारायण पवार साहेब यांनी व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती साठी समर्थ सोशल फौंडेशन सर्वांसाठी एक महामार्ग ठरेल असा आशावाद व्यक्त केला, या वेळी पीएनबी मेटलाइफ समर्थ सोशल फौंडेशन टीम सोबत लवकरच व्यवसाय सुरू करणार असल्याचे संकेत दिले. 

     यावेळी  शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे सागर देसाई साहेब, जिल्हा समन्वयक महिला आयोगाचे आनंदा शिंदे साहेब, मध्यप्रदेश येथुन उपस्थित राहत स्वामी वासुदेवनंदगिरी महाराज, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

                    पुरस्कार विजेते

   यावेळी संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्त झालेल्या व्यक्ती  तसेच त्यांचे कुटुंबीयांनी आपली मनोगते व्यक्त करत संस्थेचे आभार व्यक्त केले.         

                   पुरस्कार विजेते

       यावेळी उपस्थित एका आई नसलेल्या व चार महिने अपघाताने कोमात राहुन व  त्यातुनही वाचलेल्या, हाॕस्पीटल खर्चामुळे स्वताचे घर गमावलेल्या, शाहीर बालकास संस्थेचे वतीने 11 हजारांची मदतही करण्यात आली. तसेच संस्थेच्या अनेक सदस्यांनीही शाहीर बालकास मदत केल्याने अनपेक्षित मिळालेली मदतीने भारावुन गेल्याने बालकाचे अश्रु अनावर झाले.

     प्रेमानंद पेडणेकर, शिल्पा पाटील, सुभाष बिरांजे आदींनी आपल्या सुमधुर आवाजाने गाणी गात उपस्थितांना मंत्रमुग्ध करत मनोरंजन केलेच पण  संस्थेचे संचालक अस्लम शेख यांनी आपल्या गायन कौशल्याने उपस्थितांच्या मनाचा वेध घेतला, त्यांनी गायलेल्या *आई* या गाण्याच्या थीम वर उपस्थितांचे अश्रु मात्र अनावर झाले.

      सकाळी १० ते सायंकाळी ७ वा. पर्यंत पार पडलेल्या या संपुर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन संस्थेचे संचालक तसेच सिनिअर विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक अस्लम शेख साहेब यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक सुहास पाटील साहेब यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement