Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने ठोठावली फाशीची शिक्षा.

पाटण - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह नेटवर्क -  चाॕकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. संतोष चंद्रू थोरात, वय 41, रा. रूवले, ता. पाटण असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 
      कराड येथील विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली  सरकार पक्षाचे वकील ऍड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद आणि ढेबेवाडी पोलिसांनी पुराव्यासह सादर केलेले दोषारोपत्र ग्राह्य मानून न्यायालयाने निकाल दिला. 
       सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष थोरात हा 29 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या गावातील एका अल्पवयीन मुलीला व तिच्या मैत्रिणीला शेतात घेऊन गेला होता. शेतातून परत आल्यावर त्या दोन्ही मुली आरोपी थोरात याच्या घराच्याबाहेर खेळत होत्या. काही वेळानंतर पीडित मुलीची मैत्रिण घरी निघून गेली. पीडित आठ वर्षीय मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत रूवले गावातील निर्जनस्थळी नेले. तिच्यावर तिथे जबरदस्तीने बलात्कार करत तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह दरीत फेकून दिला. 
    या बाबत पोलीसांनी आधिक तपास करत संशयिताला अटक केली. तसेच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी युक्तिवाद केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement