Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट 1 ऑगस्ट 2026: पाणीसाठा 90.03 टीएमसी; नदीपात्रालगत नागरिकांना सतर्कतेचा इशारा... सकाळी 10 वाजता पुन्हा विसर्ग वाढणार...

कोयना धरण पाणीस्थिती (१ ऑगस्ट २०२६): उपयुक्त पाणीसाठा 84.80% वर; धरणातून 23,520 क्यूसेक्स विसर्ग सुरु... सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवणार...

कोयना नगर (सातारा )आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल - कोयना धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा 84.91 टीएमसी (84.80%), तर एकूण पाणीसाठा 90.03 टीएमसी (85.54%) इतका झाला आहे. धरणाची पाणीपातळी 2151 फूट 08 इंच (655.828 मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. कोयना येथे 177 मिमी, नवजा येथे 205 मिमी पावसाची नोंद झाली असून महाबळेश्वरचा एकूण हंगामी पाऊस 3826 मिमी इतका झाला आहे.
सध्या धरणात 59,643 क्यूसेक्स (5.15 टीएमसी) वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. वाढत्या आवकेमुळे धरणातून KDPH मार्फत 1,050 क्यूसेक्स आणि रेडियल गेटद्वारे 22,470 क्यूसेक्स, असा एकूण 23,520 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
प्रशासनाने कोयना नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदीपात्रात उतरणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

🚨*सावधानतेचा इशारा*🚨

*कोयना धरण*
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. 

कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी *आज दि. ०१  ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी  १०:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटावरून ६ फुटापर्यंत उघडून ३२,७७६ क्युसेक  विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.*

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. *कोयना नदीमध्ये एकूण ३३,८२६ क्युसेक विसर्ग सुरू होईल.*

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येव्यानुसार सांडव्यावरून  विसर्ग वाढवला जाऊ शकतो.

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापन कडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement