छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर (कोयना धरण ) 2026): उपयुक्त पाणीसाठा 86.08% वर; धरणातून 33,826 क्युसेक्स विसर्ग सुरू...
आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - कोयनानगर(सातारा ): संजय डुबल दि. 2 ऑगस्ट 2026 :सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर (कोयना धरण ) पाणीसाठ्यात वाढ कायम आहे. आज (2 ऑगस्ट) सकाळी 8:00 वाजेच्या अहवाला नुसार धरणाची पाणीपातळी 2152'08"(656.133 मी.) इतकी नोंदविण्यात आली आहे.
धरणातील एकूण पाणीसाठा 91.31 टीएमसी (86.76%) असून उपयुक्त (Live) पाणीसाठा 86.19 टीएमसी (86.08%) इतका झाला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात धरण समाधानकारक भरत असल्याचे चित्र आहे.
धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत कोयना येथे 63 मिमी, नवजा येथे 55 मिमी आणि महाबळेश्वर येथे 88 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस अनुक्रमे 3135 मिमी, 3769 मिमी आणि 3930 मिमी इतका झाला आहे.
सध्या धरणात 49,073 क्युसेक्स (4.23 टीएमसी) पाण्याची आवक सुरू असून, कोयना जलविद्युत प्रकल्पातून (KDPH) 1,050 क्युसेक्स आणि रेडियल गेटमधून 32,776 क्युसेक्स असा मिळून 33,826 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


0 टिप्पण्या