'सीडबॉल्स' चित्रपटाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन; 15 ऑगस्टपर्यंत सहभागाची संधी...
पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने "MISSION 10 LAKH TREE PLANTATION & 1 CRORE SEEDBALLS TOSSING" या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत लवकरच प्रदर्शित होणाऱ्या "सीडबॉल्स" या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन साज एंटरटेनमेंट यांनी केले असून, एस. आर. दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि हरित भविष्यासाठी जनजागृती करणे हा आहे.
https://seedballmovie.com/participation.php या लिंकवर जाऊन सहभागाचा फॉर्म पूर्ण भरावा.
फॉर्म भरल्यानंतर Saaz Entertainment चे अधिकृत Instagram पेज Follow करावे.
स्वतःच्या रोपासोबतचा फोटो आपल्या Instagram पेजवर अपलोड करून Saaz Entertainment ला Collaborator म्हणून जोडावे.
स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट आहे.
लावलेल्या रोपाचे जतन करून त्याची योग्य काळजी घ्यावी. त्याच रोपासोबत आपण ज्या स्पर्धेत सहभागी झाला आहात त्याचा व्हिडिओ तयार करावा.
15 ऑगस्टनंतर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी स्वतंत्र लिंक स्पर्धकांना पाठविण्यात येईल. त्या लिंकवर व्हिडिओ अपलोड करावा.
आयोजकांनी अधिकाधिक नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती आणि पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमात सहभागी होऊन वृक्षलागवडीचा संदेश समाजात पोहोचवावा, असे आवाहन केले आहे.
"सीडबॉल्स" हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून, पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, हा सकारात्मक संदेश देणारा प्रेरणादायी चित्रपट ठरणार आहे.


0 टिप्पण्या