कोयना धरणात पाण्याची आवक कायम; उपयुक्त पाणीसाठा 62.66 टक्क्यांवर
कोयना नगर -दि. 23 जुलै : संजय डुबल — सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवार (दि. 23 जुलै) सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाची पाण्याची पातळी 2127.06 फूट (648.462 मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे.
धरणातील एकूण पाणीसाठा (Gross Storage) 67.86 टीएमसी (64.48 टक्के) असून उपयुक्त पाणीसाठा (Live Storage) 62.74 टीएमसी (62.66 टक्के) इतका आहे.
गेल्या 24 तासांत कोयना येथे 132 मिमी, नवजा येथे 122 मिमी आणि महाबळेश्वर येथे 146 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर एकूण हंगामी पर्जन्यमान अनुक्रमे 2203 मिमी, 2524 मिमी आणि 2961 मिमी इतके झाले आहे.
सध्या धरणात 45,189 क्यूसेक्स (3.90 टीएमसी) वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. मात्र, कोयना जलविद्युत प्रकल्प (KDPH) तसेच धरणाच्या रेडियल गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नसून एकूण विसर्ग शून्य क्यूसेक्स आहे.
संततधार पाऊस आणि धरणातील वाढती आवक लक्षात घेता जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
– आपला महाराष्ट्र न्यूज Live
संपादक : संजय डुबल


0 टिप्पण्या