Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पुणे : संत निरंकारी मिशनच्या वारजे रक्तदान शिबिरात २३६ युनिट रक्त संकलित; मानवसेवेचा प्रेरणादायी उपक्रम....

संत निरंकारी मिशनच्या वारजे रक्तदान शिबिरात २३६ युनिट रक्त संकलित; मानवसेवेचा प्रेरणादायी संदेश...

पुणे ( वारजे ) :-आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल.:- करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाच्या भावनेतून समाजसेवेचा संदेश देणाऱ्या संत निरंकारी मिशनतर्फे वारजे (शिवणे), पुणे येथे २ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल २३६ युनिट रक्त संकलित करण्यात आले.     निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित या उपक्रमात निरंकारी रक्तपेढी आणि ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीतील अनुभवी डॉक्टर व वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची आवश्यक तपासणी करून सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण शिबिरात स्वच्छता, सुरक्षितता, नियोजन आणि सेवाभावाला विशेष प्राधान्य देण्यात आले.
      शिबिराचे उद्घाटन मिशनच्या पुणे सिटी सेक्टर प्रमुख पुष्पा करमचंदनी यांच्या हस्ते झाले. यावेळी क्षेत्रीय संचालक अवनित तावरे आणि अशोक कोऱ्हाळे यांच्यासह अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनी उपस्थित राहून संत निरंकारी मिशनच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले.
       संत निरंकारी मिशनची रक्तदानाची सेवा-परंपरा गेल्या चार दशकांहून अधिक काळ अखंड सुरू असून, देशभरात आयोजित रक्तदान शिबिरांतून आतापर्यंत १५ लाखांहून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. मानवसेवेसाठी मिशनची असलेली अटळ बांधिलकी या कार्यातून अधोरेखित होते.
     युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांनी तरुणांना नशामुक्त जीवन स्वीकारून समाजसेवेसाठी योगदान देण्याचा संदेश दिला होता. त्यानंतर बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी "रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे" हा प्रेरणादायी संदेश देत रक्तदान चळवळीला व्यापक स्वरूप दिले. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मानवसेवेची परंपरा आजही प्रभावीपणे पुढे सुरू आहे.
      कार्यक्रमाच्या शेवटी श्री. विजय कदम यांनी उपस्थित मान्यवर, रक्तदाते, स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी तसेच आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. :::

संपादक -  संजय डुबल 
9172830799 व्हाट्सअप फक्त..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement