Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनानंतर मोठा निर्णय

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; देशभरातील विद्यार्थी आंदोलनानंतर मोठा निर्णय....

नवी दिल्ली | संजय डुबल : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (25 जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला. NEET-UG परीक्षा, पेपरफुटीचे आरोप आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 
       राजीनाम्याची माहिती देताना धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद केले. सुरू असलेल्या वादामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि परिस्थितीचा गैरफायदा कोणालाही घेता येऊ नये, या उद्देशाने आपण पंतप्रधानांकडे राजीनामा सादर केल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

       गेल्या काही आठवड्यांपासून विविध विद्यार्थी संघटनांकडून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी करत आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही सातत्याने करण्यात आली होती. अखेर वाढत्या दबावानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला.
या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारच्या पुढील निर्णयाकडे आणि नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नियुक्तीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement