Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ तरुण किंवा ज्येष्ठ वर्गच नाही तर चिमुकले देखील शुभेच्छा देण्यासाठी हजर....

पाटण - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - चंद्रकांत सुतार - 
नुकताच सातारा चे पालक मंत्री शंभूराज देसाई यांचा वाढदिवस संपन्न झाला. यावेळी राज्यभरातून अनेक मान्यवरांनी मंत्री शंभूराज देसाई यांना शुभेच्छा दिल्या, थोरा मोठ्यांसह लहान मुले ही शुभेच्या देण्यासाठी उपस्थित होती.
        पाटण तालुक्यातील या चिमुकल्या बहुधा आपल्या आजी आजोबा सोबत  मां पालकमंत्री याना शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या. मात्र शुभेच्छा देण्यासाठी बरीच मोठी रांग लागलेली होती व. थोडे उन देखील लागत होते. प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी  तेथून जात असताना ही बाब त्यांनी पाहिली.  रांगेमध्ये जवळ जाऊन या चिमुकल्यांना तुम्ही पण शुभेच्छा देण्यासाठी आल्या आहात का? असे विचारले तर त्या हो म्हणाल्या. मग लगेच जवळच्या एका पोलीस कर्मचारी याना बोलावून घेतले . त्यांना सांगितले की चिमुकल्यांना   त्यांचे  ज्येष्ठ आजी आजोबा सह  थेट मंत्री महोदय यांची भेट घडवून द्या. पोलीस उपअधीक्षक श्री विवेक लावांड  यांनी  देखील त्यांना थेट प्रवेश देऊन मंत्री महोदय यांची भेट घडवून दिली.           
त्यावेळी मंत्री महोदय यांनी देखील त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या तसेच  चिमुकल्यांची  आस्थेवाईक पणे विचारपूस केली. जाताना त्या चिमुकल्याचा चेहऱ्यावर अर्थातच आनंद होता ,जाताना सुंदर असे निरागस स्मितहास्य केले व प्रांताधिकारी याना चिमुकल्यांनी हात हलवून bye bye देखील केले.
पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ तरुण किंवा ज्येष्ठ वर्गच नाही तर अशी चिमुकले देखील शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक असतात हे या निमित्ताने दिसून आले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement