Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


धम्मदिप नगरात बुद्धिसम्राटांचा शालांत प्रवेश दिन मोठ्या उत्साहात साजरा

धम्मदिप नगरात बुद्धिसम्राटांचा शालांत प्रवेश दिन मोठ्या उत्साहात साजरा

पाटण. आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - . चंद्रकांत सुतार - डोंगरी आणि दुर्गम अशा पाटण तालुक्यातील मौजे दिवशी बुद्रुक तालुका पाटण जिल्हा सातारा. या दुर्गम गावात दिनांक ०७ नोव्हेंबर २०२3 रोजी सम्राट अशोक क्रीडा मंडळ दिवशी. व  दिवशी उत्कर्ष मंडळ मुंबई. यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मदीप नगर मधील बुध्द विहारात अतिशय उत्साहात व आनंदात विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आयु. शंकर कदम (नाना गुरुजी) व कुमारी.दिक्षा गवळी (बाल विद्यार्थीनी) यांच्या हस्ते प्रज्ञामय जीवनाचे प्रतिक दिप. व शिलमय जीवनाचे प्रतिक अगरबत्ती. प्रज्वलित करून, अखिल विश्वाचे मार्गदाता तथागत भगवान बुद्ध.व बुद्धी सम्राट डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महा मानवांना वंदन करून पुजन करण्यात आले. त्याच प्रमाणे आयुष्य मानिनी वर्षा गवळी (वरिष्ठ विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअर) आयु.मानिनी शीला गवळी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प व  पुष्पमाला अर्पणकरण्यात आली.व पंचांग प्रणाम करून सामुहिक त्रिसरण पंचशील वंदनेने या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या नंतर अनेक विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी आणि गावातील प्रतिष्ठितांनी आपापली मनोगतं व्यक्त केली. तसेच आयु. शंकर कदम (नाना गुरुजी) यांनी उपस्थितांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित संघर्षाची गाथा. तसेच आरक्षण या विषयावर संबोधित केले . 
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. अमित गवळी (भारतीय बौद्ध महासभा बौद्धांचार्य) यांनी केले तसेच चालु जीवनावर विद्यार्थी दशेत आपली भूमिका तसेच समाजातील मतभेद दूर करून एकोपा तसेच महापुरुषांचे विचार जन माणसात कसे रुजवू शकतो व धम्म प्रचार आणि प्रसार अधिक गतिमान कसा करता येईल या विषयी मार्गदर्शन केले. व उपस्थितांचे आभार व्यक्त करत धम्म पालन गाथा व सरणतय गाथा घेऊन या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement