कवी पिराजी जाधव यांना समाजसेवेचा  पुरस्कार जाहीर.

 मुंबई - वसई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल. - विरार एकता कल्चरल अकादमी
यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या साहित्य कला महोत्सव निमित्ताने कवि पिराजी जाधव यांना या वर्षी बिरसा मुंडा समाजसेवेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जानेवारी 2024 रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
      सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ व सन्मानपत्र पत्र देवून त्यांना गौरविण्यात येणार आहे .
  मूळचे पाटण तालुक्यातील तामकडे गावचे व सध्या वालीव वसई (मुंबई ) स्थित कवि पिराजी जाधव यांचे चार कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्याच्या एका कविता संग्रहाला पुरस्कारही मिळाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र पिराजी जाधव यांचे अभिनंदन होत आहे.