कोयना धरणातील उपयुक्त पाणीसाठा 82.60 टक्क्यांवर; नदीपात्रात 11,680 क्युसेक्स विसर्ग,
आज रात्री १०:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे २ फुटावरून ३ फुटापर्यंत उघडून १६,५३५ क्युसेक पाणी पत्रात सोडणार आहे..नदी काठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा...
आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - कोयनानगर, ( संजय डुबल ) दि. 31 जुलै: कोयना धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. आज (31 जुलै) सायंकाळी 5.00 वाजताच्या अहवालानुसार धरणाची पाणीपातळी 2149 फूट 11 इंच (655.295 मीटर) इतकी झाली आहे.
सध्या धरणातील एकूण पाणीसाठा 87.83 टीएमसी (83.45 टक्के) असून उपयुक्त पाणीसाठा 82.71 टीएमसी (82.60 टक्के) इतका झाला आहे.
गेल्या 24 तासांत कोयना येथे 86 मिमी, नवजा येथे 111 मिमी आणि महाबळेश्वर येथे 86 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात 59,194 क्युसेक्स (1.91 टीएमसी) पाण्याची आवक सुरू आहे.
धरणातून सध्या KDPH मधून 1,050 क्युसेक्स तर रॅडियल गेटद्वारे 10,630 क्युसेक्स असा मिळून एकूण 11,680 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.
प्रशासनाने कोयना नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदीपात्रात उतरणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगितले आहे.
🚨*सावधानतेचा इशारा*🚨
*कोयना धरण*
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.
कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी *आज दि. ३१ जुलै २०२६ रोजी रात्री १०:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे २ फुटावरून ३ फुटापर्यंत उघडून १६,५३५ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.*
कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. *कोयना नदीमध्ये एकूण १७,५८५ क्युसेक विसर्ग सुरू होईल.*
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापनाने सूचित केले आहे...


0 टिप्पण्या