घरगुती गणपती सजावट रील स्पर्धेतून निसर्ग संवर्धनाचा संदेश; ‘सीडबॉल्स’ चित्रपटाच्या माध्यमातून १० लाख झाडे लागवडीचे मिशन
मुंबई : आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल :-आगामी मराठी चित्रपट ‘सीडबॉल्स’च्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश देत मोठ्या हरित मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. १० लाख झाडांची लागवड आणि १ कोटी Seedballs Tossing हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या हरित मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी घरगुती गणपती सजावट रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी गणरायासमोर निसर्ग संवर्धनाची शपथ घेत रील तयार करायची आहे. त्यामध्ये “मी निसर्गाचे रक्षण करेन, यावर्षी एक झाड लावेन, त्याची जोपासना करेन आणि ते मोठे करेन” असा संकल्प व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🌱 स्पर्धेची महत्त्वाची माहिती
- नोंदणीची अंतिम तारीख : २० सप्टेंबर
- व्हिडिओ अपलोड कालावधी : २१ ते २५ सप्टेंबर
- निकाल : १ नोव्हेंबर
- साज एंटरटेनमेंटचे Instagram पेज Follow करणे अनिवार्य
- स्पर्धकांना जास्तीत जास्त Likes मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करता येणार.
- सर्वाधिक Likes मिळवणाऱ्या स्पर्धकांची विजेते म्हणून निवड केली जाणार.
- आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
- विजेत्यांना बक्षीस स्वीकारण्यासाठी स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजकांनी दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण फॉर्म भरावा.
एक मोदक निसर्गाचा*
🌱✨ MISSION: 10 LAKH TREE PLANTATION & 1 CRORE SEEDBALL TOSSING ✨🌱
🏡🌿 घरगुती गणपती सजावट रील स्पर्धा — निसर्गासाठी एक प्रेरणादायी पाऊल! 🌿🎥
लवकरच प्रेक्षकांच्या मनात हिरवी आशा जागवणारा आमचा आगामी मराठी चित्रपट “सीडबॉल्स” आपल्या भेटीला येतोय! 🎬🍃
पण हा प्रवास केवळ चित्रपटापुरता मर्यादित नाही...
🌱 १० लाख झाडांची लागवड
🌱 १ कोटी Seedballs Tossing
🌱 आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हरित भविष्याची निर्मिती!
या हरित मोहिमेत तुमचाही सहभाग असावा, यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत —
🎥 घरगुती गणपती सजावट रील स्पर्धा! 🎥
तुमची सर्जनशीलता दाखवा, स्पर्धेत सहभागी व्हा आणि निसर्गासाठीच्या या सुंदर उपक्रमाचा एक भाग बना. 🌍💚
📝 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संवाद :-
*हे गणराया तुझ्या चरणी नतमस्तक होऊन शपथ घेतो की, मी निसर्गाचे रक्षण करेन आणी या वर्षी एक ( शक्य असेल तेवढा अंक बोलावा ) झाड लावेन त्याची जोपासना करेन व ते मोठे करेन. गणपती बप्पा मोरया .....जय सीडबॉल 🙏*
खालील लिंकवर क्लिक करून संपूर्ण फॉर्म भरावा:
https://seedballmovie.com/participation2.php
‘एक Reel तुमची… एक संकल्प निसर्गासाठी… आणि एक पाऊल हिरव्या भविष्यासाठी!’ या संदेशातून नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘सीडबॉल्स’ हा आगामी मराठी चित्रपट असून, चित्रपटाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा विचार अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
🌱 एक Reel तुमची…
एक संकल्प निसर्गासाठी…
आणि एक पाऊल हिरव्या भविष्यासाठी! 🌍💚
🎬 सीडबॉल्स — लवकरच आपल्या भेटीला!
#Seedballs #Mission10LakhTrees #1CroreSeedballs #TreePlantation #GreenFuture #GanpatiDecoration #ReelCompetition #MarathiMovie #SaazEntertainment #SaveNature #GoGreen
आपला महाराष्ट्र न्यूज live...
बातमी, प्रमोशन व मुलाखती साठी संपर्क - 9172830799


0 टिप्पण्या