चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या कु. अनन्या सुतार हिचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार
पाटण : आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह : प्रतिनिधी - चंद्रकांत सुतार - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २, रामापूर येथे विविध शालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेच्या वतीने उत्साहात पार पडला.
या स्पर्धांमध्ये इयत्ता चौथीतील शालेय चित्रकला स्पर्धेत कु. अनन्या सूर्यकांत सुतार हिने प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक स्वराज दीपक मोहिते, तर तृतीय क्रमांक दुर्वा संतोष कांबळे यांनी मिळविला.
प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शाळेच्या वतीने कु. अनन्या सुतार हिचा पारितोषिक, चित्रकलेची वही आणि रंगपेटी देऊन विशेष सत्कार करण्यात आला होता.
या सत्काराची दखल घेत तसेच कु. अनन्या हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचवदन विद्यार्थी गुणगौरव समिती, सातारा यांच्या वतीने तिचे औक्षण करून विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या शैक्षणिक व कलात्मक यशाचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कु. अनन्या सुतार हिच्या चित्रकलेतील या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच सर्व स्तरातून तिचे विशेष कौतुक होत आहे.


0 टिप्पण्या