मुंबई : आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक कुकू कोहली यांचे कोकिळाबेन हॉस्पिटल मध्ये वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांचे ते पती होतं...
कुकू कोहली यांनी आपल्या दिग्दर्शनातून हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. ‘फूल और कांटे’ या गाजलेल्या चित्रपटातून अभिनेता अजय देवगण यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचे श्रेय कुकू कोहली यांना जाते.
‘फूल और कांटे’ व्यतिरिक्त त्यांनी ‘सुहाग’, ‘हकीकत’, ‘जुल्मी’, ‘अनाड़ी नंबर 1’ आणि ‘ये दिल आशिकाना’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
कुकू कोहली यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली.
बॉलिवूडमधील एका महत्त्वाच्या दिग्दर्शकाचा प्रवास आज थांबला असून, त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेल्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
खबर राज्याची, प्रत्येक घडामोडीची
संपादक - संजय डुबल
9172830799


0 टिप्पण्या