Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट..... नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे...

                     कोयना धरण अपडेट
                  कोयना धरण संग्राहीत छायाचित्र

 कोयना नगर- आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह- (संजय डुबल) 

 दिनांक: 26/07/2025, संध्याकाळी 5:00
 पाण्याची पातळी: 2144'07'' 
 (६५३.६६९ मी)
 
 एकूण स्टोरेज: 83.05 TMC (78.91%)

 आवक : 49,455 क्युसेक.
 (4.27 TMC) 

 डिस्चार्ज-
 KDPH : 2100 क्युसेक.
 रेडियल गेट: 16,565 क्युसेक.
 एकूण विसर्जन: 18,665 क्युसेक.

 मिमी मध्ये पाऊस- आज अखेर पडलेला पाऊस
 (दैनिक/संचयी)
 कोयना- 23/2817
 नवजा- 33/3034
 महाबळेश्वर- 51/3073
कोयना धरण 

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी  आज दि. २६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटांवरून ५ फुटापर्यंत उघडून २०,९०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण २३,००० क्युसेक विसर्ग सुरू होईल. 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement