Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पाटण निकम स्पोर्ट्स क्लबच्या कु. शांभवी देशमुख व अवंतिका भागवत यांची मुलींची क्रिकेट डिफेन्स आर्मी अकादमीच्या अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड

पाटण - प्रतिनिधी (चंद्रकांत सुतार)
     पाटण येथील निकम स्पोर्ट्स क्लबच्या मुली शांभवी शिरीष देशमुख व अवंतिका विद्याधर भागवत यांनी उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केल्याने त्यांची पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत झालेल्या क्रिकेट डिफेन्स आर्मी अकादमीच्या अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली. 15 वर्षाखालील गटात या दोन मुलींची निवड झाली आहे त्यांना निकम स्पोर्ट क्लबचे संजय निकम (पोलिस निरीक्षक ), धर्मेंद्र पवार, शिरीष देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
     या यशाबद्दल क्लबचे संस्थापक अध्यक्ष बकाजीराव निकम, चंद्रगुप्त निकम, मंगेश पाटणकर, वैभव पाटणकर, शंकर यादव, विलास मोरे, दत्तात्रय जगताप, यांनी कौतुक करत  सांभवी देशमुख आणि अवंतिका भागवत यांचा गौरव केला. या यशाबद्दल त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छl दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement