Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


होया लेन्स इंडिया प्रा.लिमिटेड या कंपनी मधील कामगारांना ११% पगारवाढ आणि कंत्राटी कामगारांना सेवेत टप्याटप्याने कायमस्वरूपी करुन घेण्यास लेखी स्वरूपात होकार...! भारतीय मजदूर संघाच्या मागणीला मोठं यश..

होया लेन्स इंडिया प्रा.लिमिटेड या कंपनी मधील कामगारांना ११% पगारवाढ आणि कंत्राटी कामगारांना सेवेत टप्याटप्याने कायमस्वरूपी करुन घेण्यास लेखी स्वरूपात होकार...!

भारतीय मजदूर संघाच्या मागणीला मोठं यश..

ऐतिहासिक करार...!

मुंबई - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - महाराष्ट्र  राज्य औद्योगिक कामगार महासंघ....संलग्न भारतीय मजदूर संघ, युनियन युनिट होया लेन्स इंडिया प्रा.लिमिटेड.तुर्भे नवी मुंबई..
      होया लेन्स ही बहुराष्ट्रीय कंपनी असून जागतिक स्तरावर ही कंपनी अग्रेसर आहे, ऑप्टिकल लेन्स हे उत्पादन बनविण्यासाठी नामांकित असून गेले १७ वर्ष नवी मुंबई तुर्भे येथे ग्राहकांच्या सेवेत रुजू आहे,अतिशय उच्च दर्जाच्या लेन्स या कंपनी मध्ये तयार होतात, अशा या कंपनीमध्ये. दि. २ जुलै २०२३ रोजी होया लेन्स इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनी मध्ये गेल्या १० वर्षांपासून कंत्राटी कामगार यांचा प्रश्न प्रलंबित होता, पगारवाढ होत नव्हती, कंत्राटी कामगार म्हणून काम करावं लागतं होतं, वेळोवेळी युनियन च्या माध्यमातून याचा पाठपुरावा सुरू होता, नेहमी कंपनी प्रशासनाकडून फक्त आश्वासन दिले जायचे.अशा परिस्थितीत  कंपनीही चालली पाहिजे, आणि कामगारही जगला पाहिजे, यासाठी कंपनी प्रशासन आणि युनियन यांनी समन्वय साधून यशस्वी बोलणी करून २०२३ च्या या करारात पहिल्या टप्प्यात जे जुने कंत्राटी कामगार आहेत अशांना कायम सेवेत समाविष्ट करून घेतले, आणि उर्वरीत कामगार टप्याटप्याने कायम करणार असं लेखी स्वरूपात करार करण्यात आला तसेच जुन्या कामगारांना जी ११% पगारवाढ देण्यात आली तीच पगारवाढ सगळ्या कंत्राटी कामगार यांना गेल्या तीन वर्षांपासून देण्यात येत आहे
      तसेच कायम सेवेत असणाऱ्या कामगारांना तीन लाखाची मेडिक्लेम पॉलिसी, शिफ्ट भत्ता, अशा सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत,
कामगार आणि व्यवस्थापन यांनी कंपनीच्या भवितव्यासाठी हातात हात घालून मिळून काम केलं पाहिजे, कोणत्याही प्रकारचे मतभेद असू नयेत, अशा पध्दतीने युनियन चे काम सुरू आहे, कामगारांनी देखील कंपनीच्या फायद्यासाठी काम केलं पाहिजे, कोणत्याही समस्येवर मतभेद! असतील तर ते विचार विनिमय करून युनियन च्या माध्यमातून सोडवले पाहिजेत, यासाठी व्यवस्थापनाने सहकार्य करणे गरजेचे आहे,             कामगार यांची कुठेही पिळवणूक होता कामा नये,याचा परिणाम त्यांच्या कामावर होईल, सन्मानाने वागणूक व त्यांचे हक्क दिले गेले पाहिजेत, शेवटी कामगार आणि कंपनी व्यवस्थापन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.या चौकटीत राहून भारतीय मजदूर संघ या युनियन च्या माध्यमातून हे कार्य अविरतपणे सुरू आहे,
     युनियनच्या माध्यमातून हा चौथा यशस्वीपणे करार करण्यात आला, हा करार संपन्न होत असताना संघटनेच्या वतीने भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र अध्यक्ष अॕड. अनिल धुमणे, प्रदेश महामंत्री मोहन येणूरे, मुंबई अध्यक्ष  बापूसाहेब दडस, अॕड. विशाल मोहिते पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली,

   मध्यभागी कविलेश सरपडवळ मार्गदर्शन       करताना
        
      कंपनी मॅनेजमेंट कडून एच. आर. अमित पॉल, श्वेता शुक्ला, सेल्स डायरेक्ट भूपेश बांदोडकर, प्रोडक्शन मॅनेजर रोहिटन भांडरवल, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मॅनेजमेंट ने युनियन च्या प्रस्तावाला मंजुरी देऊन जुन्या मॅनेजमेंटकडून कित्येक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यास वरील अधिकाऱ्यांनी कामगार यांची बाजू व प्रश्न समजून घेऊन यावर चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मदत केली, त्यासाठी युनियन आणि कामगार वर्गाकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
      युनियन युनिट पदाधिकारी यांच्या वतीने यशस्वी पणे ज्यांनी पाठपुरावा केला ते युनिट सचिव सुरेंद्र गिजे, अध्यक्ष अमोल भुवड, उपाध्यक्षा  भाविशा चावडा, सहसचिव सचिन हुंबरे, खजिनदार विलास पाष्टे, नितिन देसाई,
समन्वयक राम डवले, कविलेश सरपडवळ यांचं सहकार्य लाभले..
          तसेच कामगारांनी दाखवलेली एकजूट आणि युनियन वरचा विश्वास यामुळे हे यश मिळाले. आणि हा भारतीय मजदूर संघाचा आणि कामगारांच्या एकजुटीचा ऐतिहासिक विजय ठरला.
    यावेळी भारतीय मजदूर संघाचे आणि होया प्रशासनाचे कामगारांच्या वतीने जाहीर आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement