अभिनेता अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड... 

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल ) टीव्ही मालिका ,चित्रपट, रंगभूमी वरील लोकप्रिय अभिनेता अतुल परचुरे यांचं आज निधन झालं.  वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

      अतुल परचुरेंना लिव्हरचा ( यकृत ) कॅन्सर झाला होता. अखेर ही झुंज अपयशी ठरली. आपल्या चतुरस्त्र अभिनयाने  मराठीतसह हिंदीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रियतमा, वासूची सासू, आम्ही आणि आमचे बाप, वाह गुरु ही काही त्यांची रंगभूमी वर गजलेली नाटके आहेत.

   मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. त्यावरही  कर्करोगावर मात करून काही महिन्यांपूर्वी त्यांनी ‘खरं खरं सांग’ नाटकातून रंगभूमीवर कमबॅक केलं होतं. याशिवाय ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकात सुद्धा ते झळकणार होते.दोन दिवसापूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. आज अतुल परचुरे यांनी जगाचा निरोप घेतला त्यांचे निधनाने सिनेसृष्टी वर शोककळा पसरली आहे.