Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या...


माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या...

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर आज रात्री वांद्रे पूर्व येथील खेरवाडी सिग्नलजवळ तीन जणांनी गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.  जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

     बाबा सिद्दीकी यांनी याच वर्षी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.  सिद्दीकी यांच्यावर 2 ते 3 राऊंड गोळीबार केल्याची घटना वांद्रे पूर्व येथे घडली.  सिद्दीकी यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.  रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  जीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर हा गोळीबार झाल्याचे समजते.  खेरवाडी सिग्नलजवळ ही घटना घडली.  बाबा सिद्दीकी यांच्यावर तिघांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.
      बाबा झियाउद्दीन सिद्दीकी हे महाराष्ट्रातील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.  मुंबई काँग्रेसचा प्रमुख अल्पसंख्याक चेहरा असलेल्या सिद्दीकी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना मंत्री म्हणूनही काम केले होते.  या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.  
      बाबा सिद्दीकी यांनी या वर्षी म्हणजेच 8 फेब्रुवारी 2024 रोजी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता.  त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.बाबा सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा आमदार होते आणि त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा, कामगार आणि FDA राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते.  याआधी त्यांनी सलग दोन वेळा (1992-1997) महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement