Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


विषय: कोकण रेल्वेच्या मागण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला कोकणव वासियांनी यायलाच हवं..!!

विषय: कोकण रेल्वेच्या मागण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला कोकणवासियांनी यायलाच हवं..!!*

मुंबई -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (गणेश तळेकर ) कोकणातील जनतेच्या जिव्हाळ्याचे दोनच प्रश्न महत्त्वाचे आहेत एक मुंबई गोवा महामार्ग व दुसरा कोकण रेल्वे..
 कोकण रेल्वे ही महाराष्ट्राच्या पैशावर उभी राहिली व सर्व देशाचा फायदा व्हावा म्हणून ती महाराष्ट्राची हद्द सोडून मेंगलोरपर्यंत जोडली गेली पण महाराष्ट्राला काय मिळालं? 
ADVT.
आम्ही 22 टक्के वाटा उचलला आम्हाला 22 टक्के च्या हिशोबाने दोन टर्मिनस मिळायला हवेत ते मिळालेले नाहीत त्यामुळे महाराष्ट्रासाठी आलेल्या गाड्या दिवा - सावंतवाडी - मडगाव असो वा नवीन सोडण्यात आलेली बांद्रा - मडगाव असो किंवा  कोकणकन्या / मांडवी  असो या गाड्या थेट मडगावला न्यावे लागतात त्यासाठी महाराष्ट्र मध्ये शेवटचं महत्त्वाचं स्टेशन असलेले सावंतवाडी टर्मिनस ज्याचे भूमिपूजन स्वतः मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले परंतु आजही हे टर्मिनस पूर्ण झाले नाही त्याचे कारण म्हणजे कोकण रेल्वेची आर्थिक चणचण. कारण हे महामंडळ असल्याने याला अर्थसंकल्पीय तरतूद नाहीच, त्यामुळे कर्जाच्या चिखलात रुतलेल्या या महामंडळाचे विलीनीकरण भारतीय रेल्वे मध्ये व्हायला हवे. 
ADVT
आज कोकण रेल्वे मार्गावर ज्या गाड्या धावतात त्या दुसऱ्या  रेल्वे झोन च्या  मालकीच्या आहेत 
कोकणी माणसाने जमीन दिली, पैसा दिला आणि महाराष्ट्राच्या वाटेला फक्त दोनच गाड्या आल्यात एक दिवा - रत्नागिरी व दुसरी तुतारी एक्स्प्रेस बाकी सर्व गाड्या गोव्यापर्यंत किंबहुना त्यापुढे धावतात.
ADVT.
दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्या मुळे दक्षिण भारतीय बांधवांचे जवळजवळ प्रवासातील पाच तास वाचतात तर त्या पाच तासातील केवळ वीस मिनिटे जरी महाराष्ट्रासाठी दिली तरी दक्षिणेकडे धावत असलेल्या व रत्नागिरी ते मडगाव पर्यंत कुठेही न थांबणाऱ्या पंधरा गाड्या आणि सीएसटी मेंगलोर, मत्स्यगंधा, नेत्रावती, मंगला, तसेच परप्रांता मधून येणाऱ्या गाड्यांना महाराष्ट्र मध्ये अधिक थांबे मिळालेच पाहिजे.तुमचा जेवढा वेळ वाचतो त्या ऐवजी तोच वेळ आम्हाला फक्त वीस मिनिटे द्या म्हणजे आमच्या जमिनी आमचा पैसा व आम्हाला वाकुल्या दाखवत जाणाऱ्या गाड्या आमच्या स्थानकावर थांबल्याच पाहिजेत.
ADVT.

तसेच ज्या मधु दंडवते यांनी ही रेल्वे आणली त्या मधु दंडवते यांचे नाव कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनस ला देण्यात यावे, 
स्थानिक भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या त्यांचा अजून 40% अनुशेष भरून निघायचा आहे तो भरून निघाला पाहिजे त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत.
ADVT.
 तसेच ज्या रायगडच्या लोकांनी 1977 च्या अगोदर जमिनी दिलेल्या आहेत त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे व वीर ते पनवेल लोकल सुरू झाल्या पाहिजे वीर पर्यंत लोकल धावल्या पाहिजेत तरच कोकणातील तरुण मुंबईमध्ये रोजगारासाठी सहज येऊ शकतो व संध्याकाळी घरी जाऊ शकतो आणि हे सर्व शक्य आहे *ते फक्त कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण झाल्यावरच हे शक्य होणार आहे तरी या सर्व गोष्टीच्या मागणीसाठी जी भव्य पत्रकार परिषद आम्ही आज एक ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन ते पाच या वेळात मुंबई प्रेस क्लब आझाद मैदान महापालिका मार्ग मुंबई एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर आपण सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी यावे.*
ADVT.

 किती दिवस शेळ्या मेंढ्या सारखा शौचालयातून प्रवास करायचा आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी येतोय, तुम्हीही या सावंतवाडी ते पालघर संपूर्ण कोकणातून हजारोच्या संख्येने पत्रकार तेथे येणार आहेत तर मग येताय ना? जर यायला जमलं नाही तर हा मेसेज एक तारीख पर्यंत एवढा प्रसिद्ध करा शेअर करा की त्या मेसेजमुळे एक तरी स्वाभिमानी कोकणी माणूस पत्रकार परिषदेला नक्की येईल.

 आपला
 सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर 
 संस्थापक सदस्य:- कोकण रेल्वे.
सल्लागार:- अखंड कोकण रेल्वे सेवा समिती
 940 41 356 19

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement