Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान... शिबिरात ४२१ निरंकारी भक्तांचे रक्तदान...

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान... शिबिरात ४२१ निरंकारी भक्तांचे रक्तदान...

पुणे - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल ): 
             सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने रविवार, २९ सप्टेंबर २०२४ रोजी संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिरांचे आयोजन शाखा धायरी व शाखा हडपसर, झोन पुणे येथे करण्यात आले होते.
यामध्ये शाखा धायरी येथे  २५१ आणि शाखा हडपसर येथे १७० संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी निस्वार्थीपणे रक्तदान केले.रक्त संकलनासाठी संत निरंकारी रक्तपेढी मुंबई, वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तपेढी,औंध रुग्णालय रक्तपेढी  आणि ससून हॉस्पिटल रक्तपेढी यांनी आपले योगदान दिले.
या शिबिराचे उद्घाटन आदरणीय ताराचंद करमचंदानी जी (झोनल इन्चार्ज-पूना झोन) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, रक्ताला पर्याय नाही, रक्तदान हीच सर्वात मोठी मानव सेवा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी पुणे झोन मध्ये मिशनद्वारा दर महिन्याला तीन ते चार रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात, ज्यामध्ये अनेक रक्तदाते सहभागी होत असतात.
ADVT.


बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि 'रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे'. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
ADVT.

            संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे  उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता  यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी  भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
            रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement