Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन...मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन...

मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास.

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल ) टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. प्रकृती खालावल्यामुळे  आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.    
      मार्च 1991 ते डिसेंबर 2012 या काळात रतन टाटा यांनी टाटा समूहाचे नेतृत्व केले.  टाटा समूह आज देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक आहे.  टाटा ग्रुपला मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत सर्व काही बनवणारी कंपनी बनवली.  त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक मोठ्या कंपन्या ताब्यात घेतल्या.
     रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला.  मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले.  यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगची पदवी घेतली.  1962 मध्ये टाटा समूहात सामील होण्यापूर्वी रतन टाटा यांनी काही काळ अमेरिकेत काम केले. 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर रतन टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले. रतन टाटा यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाला नवी ओळख दिली.
        रतन टाटा यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाला नवी ओळख दिली.  त्याने टेटली, जग्वार लँड रोव्हर आणि कोरस यासह अनेक मोठ्या परदेशी कंपन्या ताब्यात घेतल्या.  त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनला. टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवलं. 
जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवलाच पण भारतात ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी  संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात दिला, कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. त्यांच्या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती
टाटा उद्योग जगताचे बादशाह असूनही राहणीमान अतिशय साधे असे..

        रतन टाटा यांना 2000 मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर  केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं. त्यांना 2021 मध्ये आसाम वैभव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं होतं.
       रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यां मध्ये देखील आदराने घेतलं जातं. सामाजिक कार्यातही अग्रेसर राहिलेल्या या दिग्गज उद्योगपतीचं निधन झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement