Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सरकारने कोणती कार्यवाही केली? - आ. सत्यजीत तांबे. रस्ते अपघातातील उपचारांची संख्या ७४ वरुन १८४ वाढवली, उपचाराच्या खर्चात प्रति रुग्ण ३० हजार रुपयांवरुन १ लाख रुपयांपर्यंत वाढ, या योजनेचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यास मंजूरी, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली माहिती

स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत  सरकारने कोणती कार्यवाही केली? - सत्यजीत तांबे

रस्ते अपघातातील उपचारांची संख्या ७४ वरुन १८४ वाढवली, उपचाराच्या खर्चात प्रति रुग्ण ३० हजार रुपयांवरुन १ लाख रुपयांपर्यंत वाढ, या योजनेचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यास मंजूरी, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली माहिती 

                   आ. सत्यजीत तांबे
मुंबई - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - राज्यात  रस्त्यावर कुठेही अपघात झाल्यास अपघातग्रस्त रुग्णाला त्वरित उपचार मिळण्याकरिता जाहीर करण्यात आलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरकारने कोणती कार्यवाही केली आहे? असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. त्याला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली की, स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतूदीमध्ये सुधारणा करुन रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या ७४ वरुन १८४ अशी वाढविण्यास व उपचाराच्या खर्च मर्यादेत ३० हजार रुपये प्रति रुग्ण प्रति अपघात १ लाख रुपये वाढ करण्यास आणि या योजनेचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
सरकारने जाहीर केलेल्या शासननिर्णयाद्वारे सदर योजना हमी तत्वावर राबवण्याची शिफारस करण्यात आली आहे का, स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्याबाबतच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या अपघातासंदर्भातील सर्व उपचारांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्येच करण्याचे प्रस्तावित आहे का? असे प्रश्न आ. तांबे यांनी उपस्थित केले.  महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्र व राज्य व देशाबाहेरील रुग्ण यांचा समावेश या योजनेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement