Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


दिल चाहता है, चक दे इंडीया फेम अभिनेता रिओ कापडीया यांचे निधन. रिओ यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

मुंबई - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह -  बाॕलीवूड अभिनेता रिओ कापडीया (Rio Kapadia) यांचे  निधन झाले आहे. रिओ यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. 
      त्यांनी दिल चाहता है, चक दे ​​इंडिया, हॅप्पी न्यू इअर, मर्दानी यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली. तसेच काही वेब सीरिजमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारली. त्यांनी मेड इन हेवन आणि द बिग बुलद या वेब सीरिजमध्ये काम केले. तसेच त्यांनी क्यूंकी सास भी कभी बहू थी,  सपने सुहाने लडकपण के  या मालिकांमध्ये देखील काम केले होते. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या मेड इन हेवन सीझन 2 या प्राइम व्हिडिओवरील वेब सीरिजच्या एका एपिसोडमध्ये  त्यांनी काम केले होते. रियो यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
त्यांनी आमीर खान, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी सोबत भुमिका साकारल्या होत्या. 
        रिओ यांच्या पार्थिवावर  15 सप्टेंबर 2023 रोजी गोरेगाव येथील शिव धाम स्मशान  भूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.  
   रिओ कपाडिया  यांच्या पश्चात पत्नी मारिया फराह, मुले अमन आणि वीर असा परिवार आहे
        रिओ कपाडिया यांच्या निधनानं मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement