Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पालिकेतील अधिकाऱ्यांच्या जागा तातडीने भरा!- मुंबई प्रदेश काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी- सहाय्यक आयुक्तपदी प्रभारी नेमणुकांचा विषय

पालिकेतील अधिकाऱ्यांच्या जागा तातडीने भरा!
- मुंबई प्रदेश काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- सहाय्यक आयुक्तपदी प्रभारी नेमणुकांचा विषय

मुंबई - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - संजय डुबल - देशातील सर्वात मोठी महापालिका, असा लौकिक असलेल्या मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्तांची पदे सध्या प्रभारी चार्ज देऊन चालवली जात आहेत. ही पदे लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाची असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या पदांवर कार्यकारी अभियंत्यांची तात्पुरती नियुक्ती केली जात आहे. हा प्रशासन खिळखिळे करण्याचा डाव असल्याची टीका करत मुंबई प्रदेश काँग्रेसने ही पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी केली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. 
                         जाहिरात
मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या जागा लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा नियम आहे. यात बाहेरील ५० टक्के उमेदवार आणि पालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकारी-कर्मचारी वर्गातून ५० टक्के उमेदवार यांची परीक्षेद्वारे सहाय्यक आयुक्तपदी निवड केली जाते. मात्र, आज २४ विभाग कार्यालयांमधील जवळपास नऊ प्रभागांमधील सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. त्या जागी सध्या कार्यकारी अभियंत्यांना तात्पुरती जबाबदारी देत प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून नेमले आहे, या बाबीकडे आ. गायकवाड यांनी या पत्रातून लक्ष वेधलं. 
                         जाहिरात

ही नियुक्ती सेवाज्येष्ठतेनुसार झाली असली, तरी नियमित सहाय्यक आयुक्त आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त यांच्या कामात फरक पडतो. याचा परिणाम विभागांमधील सेवा-सुविधांच्या कामांवर होतो. तसेच ही नेमणूक प्रभारी असल्याने विभागातील इतर अधिकारी अथवा कर्मचारीही या प्रभारी सहाय्यक आयुक्तांचे आदेश गांभीर्याने घेत नाहीत, ही बाब पत्राद्वारे मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आ. वर्षा गायकवाड यांनी निदर्शनास आणली.
                           जाहिरात

मुंबई महापालिकेचा कारभार खूप मोठा आहे. कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर पालिकेच्या कामाचा परिणाम होतो. अशा वेळी सहाय्यक आयुक्त यासारख्या महत्त्वाच्या पदावर नियमित अधिकारी नसणे, हे प्रशासन खिळखिळे करणारे आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करून योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी आ. गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.                  
                         जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement