Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


थ्री इडियटस फेम अभिनेता अखिल मिश्रा यांचे निधन.

मुंबई - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह-  बॉलीवुड मधील थ्री इडियटस फेम अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार अखिल मिश्रा हे त्यांच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये काम करत असताना तोल जाऊन पडल्याने वयाच्या 58 व्या वर्षी दुर्देवी मृत्यु झाला. 

     त्यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये ताकतीच्या भूमिका वठवल्या होत्या. त्यांनी भवर, उतरण, उडान, भारत एक खोज, सीआयडी, हातीम, रजनी, श्रीमान श्रीमती यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. याशिवाय थ्री इडियट्स, डॉन, गांधी, माय फादर, शिखर, हजारो ख्वाहीशे ऐसी, कमला की मौत, वेल डन अब्बा यासारख्या चित्रपटात त्यांनी भुमिका साकारल्या होत्या. थ्री  इडियट्स चित्रपटातील ‘लायब्ररियन दुबे’ ही त्यांची भूमिका विशेष गाजली होती. 

अखिल मिश्रा यांच्या अकस्मित निधनाने बॉलीवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

आमीर खान, आर. माधवन, शर्मन जोशी , बोमन इराणी यांसारख्या तगड्या अभिनेत्या समोर अखिल मिश्रा यांनी स्वतःची वेगळी छाप सोडली होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement