Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

मुंबई - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.  
           पुरस्कारासाठी निवड झाल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवर हा सन्मान जाहीर करताना लिहिले की 'वहिदा रहमान जी यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद आणि सन्मान वाटत आहे'. अनुराग यांनी पुढे लिहिले, 5 दशकांहून अधिक काळातील कारकिर्दीत, त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. वहिदाजी समर्पण, वचनबद्धता आणि एका भारतीय नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे. या पोस्टद्वारे त्यांनी वहिदा यांचे कौतुक केले आहे.


  अभिनेत्री वहिदा रहमान यांनी 'गाइड', 'प्यासा', 'कागज के फूल' आणि 'चौदहवीं का चांद', 'खामोशी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. वहिदा रहमान यांच्या हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी समीक्षकांनी नेहमीच प्रशंसा केली आहे.  
   जवळपास पाच दशकांहून अधिक काळात त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटामध्ये काम केलं आहे. 
     'रेश्मा और शेरा' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. शिवाय  त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. 
अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येईल.
                          जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement