Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना "कर्मवीर" होण्याची सुवर्णसंधी.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना "कर्मवीर" होण्याची सुवर्णसंधी.

सौजन्य
अरविंद जाधव
सातारा - ठाणे.

  श्रावण रानभाजी महोत्सवात ठाणे जिल्ह्यातील  ग्रामीण व्यावसायिक महिलांनी कंबर कसली आहे. आपला नैसर्गिक,आयुर्वेदिक व सेंद्रिय भाजीपाला घेवून खुल्या बाजारपेठेत उतरल्या आहेत. या ग्रामीण महिला भविष्यातील रोजगार क्रांती करणार आहेत. 

     सध्या श्रावण मास सुरू आहे धार्मिकवृत्ती असणारे हा महिना कटाक्षपणे पाळतात. श्रावण मास हा धार्मिक ,मानसिक व शारीरिक फायदा असणारा एक महिना आहे. श्रावण मास मध्ये मांसाहार वर्ज्य असल्याने भाजीपाला व्यवसायात मोठी उलाढाल होत असते. मुळात ही मराठी संस्कृती मराठमोळ्या शहरांत जास्त प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे शहरात भाजी विक्रेते यांची रेलचेल असते. मराठी संस्कृती जपणाऱ्या ठाणे जिल्ह्यात एक विलक्षण व आशादायी चित्र सध्या पाहावयास मिळते. मोठ्या शहरातील भाजी व्यवसायात मराठी टक्का हा चिंताजनक असताना श्रावण "रानभाजी महोत्सव" मध्ये मराठी टक्का पाहावयास मिळत आहे. त्याही पेक्षा त्यांच्याकडे मिळणारा भाजीपाला हा औषधी व रानमेवा आहे. वर्षभर माहीत नसलेला हा रानमेवा या निमित्ताने खाण्यासाठी मिळतो हे वैशिष्ट्य समजावे लागेल अन याचा भरपूर स्वाद "ठाणेकर" उठवतात. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व राज पंचायत विभागामार्फत हा हंगामी उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसतात. मुळात ठाणे जिल्ह्याला निसर्गाची "रानमेवा" ही अमृत देणगी आहे. ग्रामीण भागातील इतर समाजासह आदिवासी समाज यात मोठ्या प्रमाणात दिसतो हे विशेष..अखेर निसर्गाच्या उत्पादनावर निसर्गाशी थेट संपर्क असलेले आदिवासी हेच प्रथम हक्कदार आहेत. यानिमित्ताने ठाणे सारख्या ग्रामीण भागातील लोक व्यावसायिक होत आहेत हे विशेष..परंतु हे सर्व हंगामी असावे का ? हा खरा प्रश्न वाटतो. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी झाली तर अशा आर्थिकदुर्बल होतकरू कुटुंबांना व्यवसाय व ठाणेकरांना आरोग्य मिळेल यासाठी प्रचंड मानसिकता जरूरी आहे.

     केंद्र सरकारने "राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन" अंतर्गत ग्रामीण व्यावसायिक यांना सबलीकरणाचा मानस केला आहे त्यासाठी जवळपास ५०० करोड रुपये निधीची तरतूद करत त्यासाठी धोरण सुध्दा आखले आहे. यासाठी ६०% केंद्र सरकार व ४०% अर्थसाह्य राज्य सरकारने करायचे आहे. या मिशनची व्याप्ती देशभर असली तरी ठाणे जिल्हाला याचा पुरेपूर फायदा होवू शकतो. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ या ५ तालुक्यांचा सदर योजनेत  समावेश झाला आहे. या पाचही तालुक्यात रानभाजी व रानमेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ठाणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या सिंचन अभावी शेतीसाठी आव्हानात्मक आहे. येथे एकमेव हक्काचे पीक म्हणजे "भात शेती" विविध जातीचे तांदळाचे उत्पादन ठाणे जिल्हा पिकवतो आहारात देखील तांदळाचा समावेश फार केला जातो. अशात आता एक जोड पीक म्हणून रानभाजी हा व्यवसाय व रोजगार म्हणून याकडे जिल्हातील ग्रामीण पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य  ग्रामविकास व पंचायतराज विभाग मार्फत "महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान" अंतर्गत "उमेद"  प्रकल्पाच्या सौजन्याने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना "रानभाजी महोत्सव" मध्ये स्टॉल मांडून देण्यात आले आहेत. 

     ठाणे जिल्हात भाजीपाल्याच्या विक्रमी विक्रीतून एकंदर ठाण्याची धार्मिक संस्कृती दिसून येते. अनेक ग्राहक हे आपल्या नेहमीच्या विक्रते यांच्याकडून भाजी विकत घेतना या रानभाजी महोत्सवास मात्र आवर्जून भेट देत आहेत व आपुलकीने भाजीपाला विकत घेत बरेच दिवसानंतर आपल्या मराठी भगिनी कडून ताजा तसेच आरोग्यदायी भाजीपाला मिळाल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे हा रानमेवा व रानभाजी सह इतर सेंद्रिय भाजीपाला कोणताही आधिकचा दर न घेता हे स्टॉलधारक विकत आहेत. या व्यावसायिक यांना आर्थिक ज्ञान नाही असा समज नसावा. त्यांना हा एक महिना का होईना बाजार स्पर्धा करायची आहे कारण ग्राहकांची मिळत असलेली आपुलकी त्यांना प्रोत्साहन देते. असेच एकदरीत चित्र टिटवाळा शहरातील वरील फोटोत दिसत आहे. श्रावणचा महिना ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये  असताना देखील पावसाने चांगलीच दडी मारली आहे. ३१ ऑगस्ट दिवशी दुपारच्या सुमारास तापमान ३१ अंश सेल्सिअस डिग्रीला पोहचले होते. ग्राहक उन्हापासून बचाव करताना छत्रीचा वापर करत होते. मात्र दिवसभर कडक उन्हात बसून हा रानमेवा ते विकतात. हे चित्र एक आशावाद देत आहे. हा "रानभाजी महोत्सव" श्रावण महिना पुरता हंगामी असल्याने स्टॉल धारकांना कायमस्वरुपी सुविधा नाहीत ग्राहक देखील कडक उन्हाचा भाजीपाल्यावर होणाऱ्या परिणामाचा विचार करत नसल्याचे दिसते तर महिला विक्रेत्या कडक उन्हाची तमा न बाळगता शासनाचा हा उपक्रम भविष्यात त्यांच्या कुटुंबाचा स्वावलंबी आधारवड होणार असल्याची आशा बाळगून आहेत हे त्यांच्याशी संवाद करताना दिसून येते. यात काही दिवस त्यांना पाऊसाचाही सामना करावा लागला मात्र त्यांची जिद्द,चिकाटी व आशा कायम दिसली. एक ग्राहक म्हणून त्यांच्याकडे पाहता त्यांच्या स्वावलंबनाची झलक मिळाली. हे तितकेच खरे आहे की मराठी माणसात स्वाभिमान आजही ठासून भरलेला आहे. नाहीतर आज महाराष्ट्रातील इतर प्रादेशिक लोकांसारखे शहरातील भंगार सारख्या विविध व्यवसाय किंवा लोकल ट्रेन मध्ये किळसवाणी कामे करताना मराठी माणूस दिसला असता. काही लोक या किळसवाणी कामांना मेहनत ही बोलतील कारण मराठी माणूस मेहनत करत नाही असा काही टक्का दुर्दैवाने काही प्रमाणात महाराष्ट्रात प्रचलित झाला आहे. परंतु सकाळी याच लोकल ट्रेन मधून दाटीवाटी सहन करत आपला रानटी झाडपाला मुंबई शहरात घेवून जाताना आपण या स्वाभिमानी ग्रामीण मराठी माणसांना पाहत नाही ? अशीच "स्वाभिमानी मेहनत" या ग्रामीण मराठी महिला दाखवत मोठे उदाहरण देत आहेत. या महोत्सवात या व्यावसायिक महिलांचा फक्त महिनाभर स्टॉल चालणार आहेत परंतु नंतर त्यांच्या उपजीविकेचे काय ? 

     बरेच दिवसानंतर "भाजीवाली मावशी" "भाजीवाली ताई" हे मराठमोळे शब्द कानावर पडत आहेत ग्राहक ही त्यांना आपुलकी देत आहेत. मुख्य बाजारपेठ पासून दूर उपलब्ध जागी त्या बसत असल्याने एरव्ही पर्याय नसल्याने ग्राहकांना नेहमीचा फुटपाथ वरचा गर्दीचा त्रास देखील महिनाभर वाचणार आहे तसेच ते महिनाभर आरोग्यदायी राहणार आहेत. हा महिना हे हंगामी ग्रामीण व्यावसायिक कमालीचे उत्साही दिसतात तितकेच ते भविष्याबाबत आशावादी देखील दिसतात. हे सर्व ग्रामीण शेतकरी व्यावसायिक राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आशेने पाहत आहेत कारण एकनाथ शिंदे आपला हक्काचा निर्णय क्षमता असणारा "ठाणेकर" मुख्यमंत्री म्हणून बसलेत. तसेच "शेतकरी मुख्यमंत्री" एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गावी शेती करताना अनेकवेळा या ग्रामीण व्यावसायिक मंडळी विविध वृत्तवहिनी व वृत्तपत्रात पाहिल्याने यांच्यातला शेतकरी सुद्धा जागा झाला आहे आणि हे स्वाभाविकच असणार. आता तर त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने तिसरी शिंदे पिढी देखील शेती करताना पाहायला मिळते. 

       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे. शिवसेनेचे स्वाभिमानी नेतृत्व व स्व.आनंद दिघे यांचे शिष्य म्हणून एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्हात मोठा मानसन्मान आहे. एक सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री याचा साक्षीदार हेच ठाणेकर आहेत. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदी असताना विभाजनपूर्व संपूर्ण ठाणे जिल्हा पिंजून काढलेला तसेच गोरगरीबांच्या संकटात धावून आलेला हा शिवसैनिक आता थेट स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व स्व.आनंद दिघे यांच्या शिवसेनेचे देशात नेतृत्व करत आहे. स्व.आनंद दिघे यांच्यानंतर हक्काचा माणूस म्हणून ठाणेकर एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहतात. मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फक्त देशाचेच नाहीतर जगाचे लक्ष वेधले आहे त्यामुळे त्याच व्याप्तीचे कार्य त्यांच्याकडून अपेक्षित आहे. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाण्याला मुख्यमंत्री पदाचा सन्मान देखील मिळाला आहे. एकनाथ शिंदे सर्वसमावेशक मुख्यमंत्री म्हणून सध्या राज्याचा गाडा हाकतात. केंद्र व राज्य सरकार यांचा हा संयुक्त उपक्रम राबवताना इतर राज्यासारखे केंद्रीय योजना व राज्य योजनांचा श्रेयवाद, आडमुठी धोरण असे भेदभाव राहणार नाहीत कारण सगळ्या जगाचा अंदाज खोटा ठरवत त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले त्यामुळे त्यांचे केंद्रातील नेतृत्वाशी संबंध कसे आहेत हे सर्वज्ञात आहे. 

    वरील चित्र हे जरी प्रतिकात्मक असले तरी ठाणे जिल्हातील ५ तालुक्यात ही संख्या हजारो नक्कीच असणार आहे तसेच या रानमेवा व रानभाजीचा विशेष स्वाद व लाभ लाखों ठाणेकर यांना मिळणार आहे. शासनाच्या व्यवसाय, रोजगार योजनेच्या लाभासाठी अनेक ग्रामीण आर्थिक दुर्बल अर्जदार असतील याची नोंद शासन दरबारी असेलच. त्यांचे संकलन करून त्यांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करून देणे जरुरीचे आहे. त्यांना शासनाच्या सर्व सुविधांचा विशेष करून केंद्र सरकारच्या "राष्ट्रीय ग्रामीण आजीवन मिशन" व महाराष्ट्र शासनाच्या "महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान" सारख्या रोजगार निगडित सर्वप्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा कारण त्यांचाच  "रानभाजी" वर पुरेपूर हक्क आहे नाहीतर भविष्यात या रानभाजीचे विक्रेते हे दुसरे असतील. जरी ही रानभाजी व रानमेवा हंगामी काळापुरता असला तरी अन्नप्रकिया करून तो इतर प्रक्रियायुक्त फळभाजी सारखा बारमाही उपलब्ध ठेवू शकतो. मुळात बाजारपेठ उपलब्ध झाली तर ते इतर उत्पादन सुद्धा विक्री करू शकतात. जरी रानभाजी महोत्सव हा शासनाचा उपक्रम असला तरी तुमचे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यांनी रानभाजी विक्रीसाठी त्यांना जागा मिळवून देताना केलेलं प्रयत्न पण या स्थानिक ग्रामीण विक्रेत्यांसाठी अमूल्य आहेत. आज छत नसताना देखील ऊन - पाऊसाचा सामना करताना जी जिद्द,चिकाटी त्यांच्यात दिसली ती खरोखरच कौतुकास्पद आहे भविष्यात जर कायमस्वरूपी छत मिळाले तर चित्र नक्कीच ऐतीहसिक असेल ती एक रोजगार क्रांतीच ठरेल. यासाठी छताची जबाबदारी साहजिकच सरकारची पर्यायाने "शेतकरी मुख्यमंत्री" एकनाथ शिंदेची असेल. 

       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू व ठाणे जिल्हाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून परिचित आहेत तसेच प्रशासनावर अंकुश असणारा मंत्री अशी त्यांची ओळख आहे याचा प्रत्यय वाशिम, सातारा जिल्हासह महाराष्ट्राला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासकीय यंत्रणा हा उपक्रम भविष्यात चांगला राबवेल यात शंका नाही. "राष्ट्रीय ग्रामीण आजीवन मिशन" हा देशासाठी एक उपक्रम आहे परंतु ठाणे जिल्हासाठी शिवसेना अभिप्रेत मराठी माणसाचा "स्वाभिमानी रोजगार" असेल. हे आशादायी ग्रामीण ठाणेकर व्यावसायिक सदैव तुमच्यासाठी व शिवसेना पक्षासाठी हक्काचा पाठीराखा राहिले आहेत. मुख्यमंत्री म्हणून जिल्हाचा अभिमानास्पद विकास निश्चित तुम्ही करत आहात. राज्यातील शेतकरी यांना देखील जे लाभ मिळाले ते देखील कौतुकास्पद आहेत. राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून कोट्यवधी रुपयांच्या निधीची मदत तसेच तुमच्या संस्थेचे आरोग्य क्षेत्रातील कार्य तर अख्खा महाराष्ट्र जाणतो त्याचे लाभार्थी तुम्हाला धन्यवाद व आशिर्वाद देत आहेत. आता तर हा नैसर्गिक रोजगाराचा प्रश्न पुसण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमची जन्मभूमी सातारा आहे हे महाराष्ट्राला कळाले परंतु आजही तुम्हाला एक ठाणेकर म्हणून राज्यात ओळखतात.

   शहरीकरणाचा अपवाद वगळता ठाणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या  मागास  आहे  त्यामुळे  ठाणे जिल्हातील ५ तालुक्यांना "उमेद" प्रकल्पात स्थान मिळाले आहे. ग्रामीण ठाणे जिल्हाची मागास अशी ओळख पुसणारा तुमच्या एवढा दुसरा नेता सध्यातरी दिसत नाही तसेच भविष्यात कोणाला अशी संधी मिळेल का? हे ही सांगता येत नाही. ठाणे जिल्हाने तुमच्याएवढे प्रेम क्वचितच दुसऱ्या कोणाला दिले असेल. तुमचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील जिल्हाचे प्रतिनिधित्व करायला हे प्रेम मिळाले. या जगात फार कमी लोक असतात ज्यांना जन्मभूमी सोडून कर्मभूमीत एवढे प्रेम व मानसन्मान मिळतो. काहींना नशिबानच उपाधी घेण्याची संधी मिळते त्यामुळे आता हीच संधी आहे कर्मभूमीची परतफेड करण्याची आणि कर्मवीर होण्याची.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement