Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


बॉलिवूड अभिनेता ज्यु. मेहमूद काळाच्या पडद्याआड.

मुंबई - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - बॉलिवूड अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं कॅन्सरमुळे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं. पोटाच्या कॅन्सरमुळे त्यांनी गुरुवारी (८ डिसेंबर) रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटच्या क्षणी अभिनेता सचिन पिळगांवकर व अभिनेता जितेंद्र यांची भेट घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सचिन पिळगावकर व जितेंद्र, अभिनेता जॉनी लिव्हर त्यांना नुकतेच भेटून गेले होते. 
       त्यांचा विनोदी अंदाज प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ज्युनियर मेहमूद यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला होता. बालपणापासूनच त्यांना फिल्मी दुनियेचं आकर्षण होतं. बालपणापासूनच ते वेगवेगळ्या कलाकारांच्या नकला करायचे.
ज्युनियर मेहमूद यांचे खरे नाव नईम सय्यद असे होते. वयाच्या ९व्या वर्षी त्यांचा मनोरंजन विश्वातील प्रवास सुरू झाला.
ज्युनियर मेहमूद यांनी तब्बल ७ भाषांमध्ये २६५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘ब्रह्मचारी’, ‘हाथी मेरे साथी’, ‘आन मिलो सजना’, ‘दो रास्ते’, ‘कटी पतंग’, ‘हरे राम हरे कृष्णा’, ‘जौहर महमूद इन हॉन्ग कॉन्ग’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘गुरु और चेला’ असे त्यांचे अनेक चित्रपट खूप गाजले होते.
त्यांचे निधनाने चित्रपट सृष्टी वर शोककळा पसरली असून त्यांचे निधनाने एक दिग्दर्शक, अभिनेता, गायक आपल्यातून निघून गेला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement