Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


वाय खान फाऊंडेशन आणि पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई यांच्या संयुक्तरित्या आयोजित ' रस्ता सुरक्षा अभियान' शिबिर संपन्न...

वाय खान फाऊंडेशन आणि पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई यांच्या संयुक्तरित्या आयोजित 'रस्ता सुरक्षा अभियान' शिबिर संपन्न...

मुंबई -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (संजय डूबल)- रस्त्यावर होणाऱ्या अपघाताने निष्काळजी पणात मृत्यू पावणाऱ्या वाहन धारकाचे त्यातल्या त्यात दुचाकी वाल्यांचे प्रमाण पहाता नागरिकांनी जागरूकतेने स्वताची काळजी वाहतूक सुरक्षतेचे नियम पाळून घेतल्यास अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होतील असे उद्गगार पोलीस उप आयुक्त डॉ.प्रविण मुंढे यांनी वाय खान फाऊंडेशन आणि पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई यांच्या संयुक्तरित्या आयोजित रस्ता सुरक्षा अभियान शिबिराच्या उध्दघाटनात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाय खान फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.हाजी फैजूलाखान हे होते.
अंजूमन इस्लाम शाळा डंकन रोड येथे त्याचे आयोजन करण्यात आले होते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सिद्दीकी शकिल अहमद यांनी करून फाउंडेशनच्या कार्याची माहिती व पाहूण्यांचा परिचय करून दिला तर पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष श्री.राजेन्द्र लकेश्री व सरचिटणीस आनंद मुसळे यांनी आपल्या समितीच्या कार्याचा अहवाल सादर केला याप्रसंगी नागपाडा पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर बिलाल शेख, वाहतूक इन्स्पेक्टर बाजीराव मोरे पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे, बॉम्बे प्रेसचे संपादक शराफत खान, लियाकत अल्ली सय्यद, वरिष्ठ पत्रकार श्रीमती सादिया मर्चन्ट, डॉ.इम्रान इत्यादी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणारे डॉ.खंडू माळवे, सलीम शेख, श्रीमती संगिता नंदल, अँड.नदिम सलमान काझी, मेहमूद हकिमी, महमंद रझा, आरीफ बंधू, शाकिर अन्सारी आणि सईद पापा भाई यांना शॉल व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.
रस्ता सुरक्षा जागरूकता प्रात्यक्षिकतेचे आयोजन डॉ.मुस्तूफा पाटणवाला, युसूफ शेख सर इम्रान सर, यांनी उत्तमरित्या केले होते यात भाग घेणाऱ्या १०० लोकाना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
     या संपूर्ण कार्यक्रमांची चोख व्यवस्था वाय फाऊंडेशनचे सिद्दीकी शकिल अहमद, हुसेन शेख, सय्यद महमद, मुख्तार पोपेरे,कादर तुर्की इकबाल मन्सूरी, इम्रान लाला फरहान चौधरी, आसिफभाई,शहिदभाई, फिरोज भाई सिद्दीकी लईक, सलमान आग्रा,अहमद भाई, शमीम शेख, तर पत्रकार उत्कर्ष समितीचे राजश्वर जोगू, अशोक परब, हेमंत अनुमाला, दत्ताराम वंजारे,उमेशं गिरोल्ला,राजू गूज्जा, आणि श्रीहरी गोसीकोंडा बाबी तळेकर यांनी अहोरात्र मेहनत करून केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement