Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन


मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह -  मराठी रंगभूमी व चित्रपट सृष्टीतील विनोदी व खलनायकाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेल्या अभिनेते रवींद्र बेर्डे यांच मुंबईत निधन झालं.ते 78 वर्षांचे होते. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ते सख्खे भाऊ होते.
          मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कर्करोगावर मात करण्यासाठी त्यांची झुंज सुरू होती. मात्र अचानक ह्रदयविकाराचा झटक्याने त्यांचे निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच रवींद्र बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते
     वयाच्या विसाव्या वर्षी रविंद्र बेर्डे यांनी नभोवाणीतून काम करण्यास सुरुवात केली. नभोवाणीत २४ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांना नाटक, चित्रपटाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. रवींद्र यांनी १९८७ मध्ये नाटकापासून मनोरजंन क्षेत्रातील कारकीर्द सुरू केली. ३१ नाटकातून विविध भूमिका करत नाट्यक्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. नाटकानंतर अभिनेते रवींद्र बेर्डे यांनी मराठी चित्रपटभूमी चांगलीच गाजविली.
     चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक हमाल दे धमाल, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला, भुताची शाळा या चित्रपटातील त्यांच्या भूमिका उल्लेखनीय राहिल्या आहेत. १९९५ साली त्यांना व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी ह्रदयविकाराचा झटका आला होता. तर २०११ मध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे निदान झाले. मात्र, कलेवरील प्रेमानं त्यांना संकटावर मात करण्याकरिता जिद्द मिळाली. त्यांनी ३०० हून अधिक मराठी चित्रपट आणि ५ हिंदी चित्रपटात काम केले. नायक द रिअल हिरो, सिंघम आणि हम दो अनजाने या हिंदी चित्रपटातदेखील त्यांनी भूमिका साकारल्या.
     त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह परिवारा तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement