Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


१८-१९ डिसेंबरला ठाण्यात "खासदार करंडक". चिंतामणी कला मंच, मुंबईच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे ४थे वर्ष

१८-१९ डिसेंबरला ठाण्यात "खासदार करंडक"

चिंतामणी कला मंच, मुंबईच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे ४थे वर्ष

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह -(गणेश तळेकर ) : चिंतामणी कला मंच, मुंबई या संस्थेमार्फत वर्षभरात अनेक उपक्रम, स्पर्धा राज्यपातळीवर राबवल्या जातात.
महाराष्ट्रातील विविध विभागातील मुलांना एक रंगमंच मिळावा, प्रतिभावंत मुले घडावी या उद्देशातून या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भरवल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे "महासंग्राम - खासदार करंडक" राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२३-२४. या स्पर्धेच्या आयोजनाचे हे ४थे वर्ष आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे या विभागातील संस्थांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे परीक्षण मराठी चित्रपसृष्टीतील तसेच मराठी नाट्य सृष्टीतील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते समीर पेणकर आणि मराठी चित्रपसृष्टी, नाट्यसृष्टी तसेच छोट्या पडद्यावरील मालिकांमधून झळकणारे सुप्रसिद्ध अभिनेते सुशील इनामदार करणार आहेत. 
 
चिंतामणी कला मंच, मुंबई संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश दीपक पिंगळे आणि स्पर्धा प्रमुख पूजा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली १८ आणि १९ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement