Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


गौरव मराठी रंगभूमीचा..... १००. व्या नाट्यसंमेलनात राज ठाकरे..... रंगभूमीवरून..... सु. बा. सरपडवळ ( नाट्यसमीक्षक )

.                .     गौरव मराठी रंगभूमीचा..... 
               १००. व्या नाट्यसंमेलनात राज ठाकरे
----------------------------------------------------
 रंगभूमीवरून..... सु. बा. सरपडवळ  ( नाट्यसमीक्षक  )

पुणे -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह- रंगभूमी वरून नाट्यसमीक्षक - सु. बा. सरपडवळ :
        अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतकिय नाट्य संमेलन, पुणे-        
  पिंपरी चिंचवड येथे संपूर्ण शहरात रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद  !

नाट्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाच्या रंगमंचावर महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ -नेते मा. ना. शरदचंद्र पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी संमेलनाध्यक्ष - नाटककार प्रेमानंद गज्वी तसेच यंदाचे संमेलनाध्यक्ष - डॉ. जब्बार पटेल, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष - अभिनेता : प्रशांत दामले,महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री - उदय सामंत, अभिनेता- मोहन जोशी, नाटककार - गंगाराम गवाणकर  , शशी प्रभू  , अशोक हांडे, गिरीश गांधी, अजित भुरे, शिवाजी शिंदे, आणि मुख्य निमंत्रक- मेघराज राजे भोसले, भाऊसाहेब भोईर, समीर इंदुलकर, दिपक रेगे, सुनील महाजन, नरेश गडेवर, सतीश लोटके, विजय चौगुले, सुनिल ढगे, दिलीप कोरके, सुरेश धोत्रे, दीपाली शेळके, किरण गुजर, समीर हंप्पी, सत्यजीत धांडेकर. सुहास जोशी, आणि जेष्ठ - कनिष्ठ - अभिनेता / अभिनेत्री व रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत
 १०० वे " मराठी नाट्य संमेलन " - गणेश कला, क्रिडा मंच. नेहरू स्टेडियम मागे - स्वारगेट पुणे येथे ०५ जानेवारी २०२४  रोजी पूर्वसंध्येला जल्लोषात : राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांच्या नाट्य संगीताने बहारदार सुरूवात झाली. त्या नंतर दुसऱ्या दिवशी  ०६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ०७ वाजता पिंपरी चिंचवड - पुणे येथून सुरू झालेली नाट्यदिंडी " मोरया गोसावी मंदिर मार्गे गांधी पेठ, पॉवर हाऊस चौक, तानाजी नगर, काकडे पार्क - " स्टेडियम " नाट्य संमेलनाचे स्थळ ( पिंपरी चिंचवड- पुणे  ) येथे दुसरी - १२ वाजता दाखल होऊन नाट्य संमेलनाचा उदघाटन सोहळा पार पडला तेव्हा प्रशांत दामले यांनी घंटानाद करून पुण्यात नाट्य संमेलन सुरू झाले असे जाहीर करण्यात आले.
परंतु खरे नाट्य संमेलन तंजावर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांचे पंतू - शहाजजी राजे भोसले यांच्या पूर्वकालीन पौराणिक - एतिहासिक आणि मराठी / हिंदी नाट्य संहितांचे सन्मान पुर्व पूजन करून नाट्य संमेलनाची खरी सुवात - २७ डिसेंबर २०२३ रोजी नाटककार - प्रेमानंद गज्वी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नाट्य सोहळा पार पडला  तो स्थानिक रंगकर्मींच्या सहभागाने तेव्हा आवर्जून उपस्थित असलेल्या नाट्य रसिकां कडून उत्तम प्रतिसाद मिळाला तो टाळ्यांच्या गजरात. आता - ०५/ ० ६/०७ जानेवारी २०२४ पासून पुणे येथे उत्तमात उत्तम विविध रंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रात्री ९ ला नाट्य रजनी हा मराठी गाण्याचा बहारदार कार्यक्रम झाला.

तीसऱ्या दिवशी ०७ जानेवारी २०२४ रोजी दिवसभर  ठिक ठिकाणी वेगवेगळ्या कला प्रकार च्या सुंदर छटा दिसून आल्या तर पुणे जिल्ह्यातील छोट्या मोठ्या सर्व शहर वस्तीतल्या सभागृहातून अन् सर्वच नाट्यगृहातील नाटकांचे प्रयोग हाऊसफुल्ल झाले होते. अगदी पुर्व संध्येच्या आदी मराठी मानबिंदू , महाराष्ट्राचे लाडके नेते मनसे अध्यक्ष -  राजसाहेब ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीत अभिनेता- दिपक करंजीकर यांनी निवडक संवादानी राजसाहेबांना बोलते केले तेव्हा बाणेदार खुसखुशीत शब्दात राजसाहेबांनी एक एक प्रसंगांचे पैलू उलगडून सांगितले! 
राजसाहेबांचे सांस्कृतिक कलेवर आणि खास करून नाटकावर , मराठी कलावंतांवर असलेल्या प्रेमा पोटी नाट्य कलावंत अर्थात कलेशी निगडित असलेल्या सर्वच रंगकर्मींना उद्देशून... एकमेकांना मान द्या  ! तरच प्रक्षेक तुमचा मान सन्मान राखतील असा मुख्य सल्ला कलाकारांना दिला. तेव्हा रसिक प्रेक्षकांच्या टाल्यांच्या गजरात सर्वांनीच आनंद व्यक्त करताना दिसला! 
नाट्य संमेलनांच्या निरोप प्रसंगी  सहभागी झालेले उपमुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीसांनी सांस्कृतिक मंत्री- सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अनेक नेते मंडळींना नाव न घेता चिमटे काढले पण त्याला फारसा प्रतिसाद दिसला नाही. पण प्रशांत दामले यांच्या भाषणातून दिलखुलास पणा दिसला! 
एकंदरीत १०० वे नाट्य संमेलन पुण्यात  गाजले वाजले....

छायाचित्र - संजय डुबल ( रंगकर्मी  ) आणि सु. बा. सरपडवळ  ( नाट्यसमीक्षक  )

दिलीप जाधव ( नाट्य निर्मिता  ) , अभिनेता- समीर चौगुले आणि सु बा सरपडवळ ( नाट्यसमीक्षक  ) नाट्यदिंडीत.....

संजय खापरे सह नाट्य दिंडीत 

   अरूण घाडीगावकर, प्रसिध्द वस्त्रहरणकार - गंगाराम गवाणकर आणि सु बा सरपडवळ  .
अरूण घाडीगावकर, अभिनेता- वैभव मांगले आणि सु बा सरपडवळ  ( नाट्यसमीक्षक  ) पुणे येथे जल्लोषात चाललेल्या नाट्यदिंडीत सहभागी.....

अशोक शिंदे  , सु बा सरपडवळ आणि केदार शिंदे ( सिने /नाट्य दिग्दर्शक  ) नाट्य संमेलनाच्या निमित्ताने कै. नाटककार "  विष्णुदास भावे  " सभामंडपात. 
            
छायाचित्र - संजय डुबल ( रंगकर्मी  ) आणि सु. बा. सरपडवळ  ( नाट्यसमीक्षक  )

  जाहिरात 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement