Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


ऐतिहासिक वारसा लाभलेले प्रसिद्ध.... !! शिवाजी नाट्य मंदिर !!

               ऐतिहासिक वारसा लाभलेले प्रसिद्ध....
                     !!  शिवाजी नाट्य मंदिर  !!
.....….......….............................................................

मुंबई -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - श्री शिवाजी मंदिर  हे " छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ " ( ट्रस्ट  ) च्या मालकी हक्काचे दादर मुंबई येथील प्रमुख  " नाट्यमंदिर " आहे! येथे अनेक रंगकर्मी 'नाट्यरसिक', कलावंतांची सतत वर्दळीच्या गर्दीत नाटक वाड्यांचे " माहेरघर " असल्याचे दिसून येते! आणि इथे अनेक विविध प्रकारची नाटक शिवाजी नाट्य मंदिरच्या रंगमंचावर सादर केली जातात या नाट्य मंदिराला परंपरेने  मराठी नाटक हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैभव लाभलेले आहे! 
.    मराठी नाटक आणि अनेक प्रकारच्या शैक्षणिक - सांस्कृतिक कलेंचा विकास व्हावा यासाठी " श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ( ट्रस्ट ) मुंबई , तर्फे गेली ८० वर्षे हा बहुमुल्य सामाजिक सेवेसाठी उपक्रम राबवले जातात. तसेच इतर अनेक संस्था/संघटनाच्या उपक्रमासाठी आमचा हातभार लावला जातो, आमच्या मंडळाच्या ट्रस्टचे  " श्री शिवाजी मंदिर " हे देखील गेली ६३/६४ वर्षे या कामी कार्यरत आहे! असे मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष- ब्रिगेडियर :सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. 
" श्री शिवाजी स्मारक मंडळ "( ट्रस्ट ) मुंबई , चे विश्वस्त - ज्ञानेश महाराव, बजरंग चव्हाण आणि ब्रिगेडियर : सुधीर सावंत. व इतरही विश्वस्त पत्रकारपरिषदेत उपस्थित होते.

  बुधवार दिनांक- १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी ० १ . वाजता शिवाजी नाट्य मंदिरच्या वरती " राजर्षी शाहू "  सभागृहात  " श्री शिवाजी मंदिर " दादर मुंबई, ट्रस्ट ने पत्रकारपरिषद आयोजित केली होती. 
.     शिवाजी मंदिरच्या नाट्यगृहात प्रयोगांच्या तारखा व सत्र प्रत्येक नाट्यसंस्थांच्या नावाने आरक्षित केल्या जातात असे असताना काही वृत्तपत्रांनी शनिवार दिनांक-२३ डिसेंबर २०२३ रोजी दैनिकातून १६ नाटकांच्या शीर्षक डिझाईन्सव्दारे बातमी प्रकाशित झालेली दिसली! 
सदर नाटकांचे प्रयोग ०१ जानेवारी पासून श्री शिवाजी मंदिर मध्ये नाट्य प्रयोग होणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतू नाट्यनिर्मिती संस्थांचा व नाट्यनिर्मात्यांचा अजिबात उल्लेख नव्हता तसेच जाहिरात प्रकाशित करणार्या संघटनेचा किंवा जाहिरात संस्थेचा ही उल्लेख नव्हता हा निनावी व्यवहार जाहिरात प्रकाशव्यस्थेत कसा असू शकतो  ? 
.    काही नाट्यसंस्था - निर्मात्यांना " श्री शिवाजी मंदिर " मध्ये त्यांच्या अडचणीमुळे नाट्यप्रयोग करायचे नसतील. पण असे दुर्गुणी पाऊल सर्वच नाट्यसंस्था / निर्मात्यांनी उचलेले नाही  ! आजही श्री शिवाजी मंदिर मध्ये इतर नाट्यसंस्थांचे नाट्य प्रयोग होतच आहेत  ! 
.    जाहीर केलेल्या जाहिराती मुळे " श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात मध्ये ०१ जानेवारी २०२४ पासून नाटकांचे प्रयोग होणार नाही, हा कुणाचा तरी खोडसाळपणा आहे! परिणामी- "  श्री शिवाजी मंदिर  " नाट्यगृहावर नाट्य निर्मात्यांचा बहिष्कार अशा बातम्या झाल्या हे वस्तुस्थितीला धरून नाही. 
      " शिवाजी नाट्य मंदिर " मध्ये १००.हून अधिक नाट्यसंस्था आणि सामाजिक संस्थांचे नाट्य प्रयोग होणार... जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ या तिमाही सत्रात आरक्षित झालेले आहेत, त्यातील पुढील आठ संस्था - १) अष्टविनायक  ( दिलीप जाधव) , २ ) मल्हार ( संतोष शिदम  ) , ३ ) प्रवेश   ( विजय केंकरे ). ४ ) रॉयल थिएटर ( मिहिर प्रविण गवळी ), ५ ) बदाम राजा प्रॉडक्शन ( निनाद कर्पे ), ६) सरगम क्रिएशन ( अजय कासार्डे ) , ७) गौरी थिएटर ( प्रशांत दामले ) , ८ ) सोनल प्रॉडक्शन ( नंदू कदम ). या ०८. निर्मात्यांनी पत्राद्वारे अपेक्षित तारखा मिळत नसल्याने २०२४ च्या जानेवारी/ फेब्रुवारी / मार्च या तिमाही वाटपातील तारखा परत करीत असल्याचे कळविले आहे. 
.    अपेक्षित तारखा, मिळत नसल्याची वरील नाट्य निर्मात्यांची तक्रार वस्तुस्थितीला धरून नाही.... या विषयाचे तक्रारपत्रही यापुर्वी त्यांनी दिलेले नाही! दैनिक वृत्तपत्रांतील बातम्या नाट्यगृहाच्या भाड्याचाही उल्लेख आहे! 
४००/- व ५०० /- रूपये तिकीट दर असल्यास नाट्यगृहचे भाडे ठरवताना अन्य नाट्य निर्मात्यांप्रमाणे वरील निर्मात्यांशी चर्चा केली होती! त्यांच्या सहमतीनेच नाट्यगृहाचे भाडे ठरविलेले आहे. याबाबत काही तक्रार असल्यास तसे पत्राद्वारे कळविणे आवश्यक होते! 
  " अष्टविनायक " नाट्यसंस्थेचे - दिलीप जाधव व नाट्यनिर्मात्यांच्या " मराठी नाट्य व्यवसायिक निर्माता संघ  " यांच्या मागणीनुसार - ५०० रूपये तिकीटाच्या प्रयोगांचे नाट्यगृह भाड्यात ६००/- रूपयांनी कपात ( कमी  ) करण्याचा निर्णय - ०१ डिसेंबर २०२३ पासूनच अमलात आला आहे  ! ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास वृत्तपत्रातून ०१ जानेवारी पासून  " श्री शिवाजी मंदिरात नाट्य प्रयोग होणार नाही, अशी जाहिरात देणे, बातम्यातून व्यक्तीक मत व्यक्त करने म्हणजे नाट्य प्रेक्षकांची आणि पर्यायाने सर्वांचीच दिशाभूल करणे ठरते!  ही आमच्या मंडळ ट्रस्टची बदनामी झाली आहे  ! या मुळे आमच्या " श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ( ट्रस्ट ) ने गंभीर दखल घेतली आहे  ! असे विश्वस्त : ज्ञानेश महाराव यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटलं आहे  !

एकंदरीत पाहता नाट्य निर्मात्यांचा पाय खोलात खोल दिसतोय.... 
         -- सु. बा. सरपडवळ  , नाट्यसमीक्षक
                                   जाहिरात
.    पत्रकारांनी विचारले आता तुमचे काय म्हणणे आहे? तेव्हा ट्रस्टचे अध्यक्ष- ब्रिगेडियर : सुधीर सावंत म्हणाले श्री शिवाजी मंदिर मध्ये नाट्य प्रयोग करण्या साठी ज्या नाट्य संस्थेला जी तारीख वेळ दिली आहे त्याच तारखेला त्याच संस्थेचा नाट्य प्रयोग करावा, आमच्या व्यवस्थापनेच्या नकळत नाट्य संस्थानी परस्पर दुसऱ्या कोणालाही आपली तारीख देऊ नये हा नियम
आम्ही काढल्यानंतर त्यांचा पोटसुळ उठला आणि हे पेपरात जाहिरात देण्याचे षडयंत्र रचले गेले. 
पुन्हा पत्रकारांने छेडले - नाट्य प्रयोगाची तारीख तर त्या त्या संस्थेचा व्यवस्थापक बदलून देऊ शकतो ना  ? तेव्हा ट्रस्टचे विश्वस्त म्हणाले - नाट्य संस्थेच्या व्यवस्थकांशी आमचा काडीमात्र समंध नाही! ते दिनानाथ नाट्यगृहाची तारीख बदलून आमच्या नाट्यगृहाची तारीख देणारे ते कोण  ? आमचा समंध नाट्य निर्मात्यांसी तसे निर्मात्यांनी आम्हाला सही सह पत्र
द्यावे ! 
.    " श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ( ट्रस्ट )  मुंबई,ने नियम लावलेला आहे तो काही मोठा विषय नसून " श्री शिवाजी नाट्य मंदिर " मध्ये तर आताही अनेक नाटक चालूच आहेत! काही लोकांनी बहिष्कार घातला असेल पण इतर नाटककार नाटक करतच आहेत ! एका पेपरात न करण्याची जाहिरात दिली ते कुठल्या माणसाने/ कुठल्या संस्थेने दिली हे आम्हांला समजले आहे  ! पण त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या सोडवल्या जातील. त्यांनी याव आमच्याशी संपर्क साधावा, आमच्याशी बोलाव  ! काही मुद्दे असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू मात्र आमचे जे नियम व अटी आहेत त्या मात्र नियमाप्रमाणे सर्वांनीच चालावे अशी आमची विनंती आहे  !
                                जाहिरात 

.     नाट्यसंस्थेला दिलेल्या तारखांना त्या त्या संस्थेचे नाटक सादर करण्यासाठी अधिकार आहे, परंतु तारखा बदलण्याचा अधिकार नाही  ! अशाने केवळ नाट्यगृहावरील तारखांचा काळा बाजार होतोय! तुम्ही २०.रांगा ५००/- रूपये तिकीट दर लावणार आणि आम्ही त्यात काहीच क्लेम करायचा नाही? हे बरोबर नाही! खरतर यावर आम्ही बंधन आनलेले नाही पण आता आणावेच लागेल. 
.     प्रेक्षक पैसे देतात म्हणून किती ओरबडायचे ? आता यासंबंधी लोकांच्या तक्रारी आमच्या कडे येऊ लागल्या आहेत ! त्यामुळे आमच्या ट्रस्ट ला आता कायदेशीर कारवाई करण्याशिवाय पर्यायच नाही. असे निश्चियपणे विश्वस्त
म्हणाले ! 
.     एकंदरीत पाहता नाट्य निर्मात्यांचा पाय खोलात खोल दिसतोय.... 
         -- सु. बा. सरपडवळ , नाट्यसमीक्षक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement