Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


माजी जि.प. सदस्या आशाताई झिमुर यांचा विशेष सन्मान

माजी जि.प. सदस्या आशाताई झिमुर यांचा विशेष सन्मान

कराड, -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह -संजय डुबल - कराड जीवन विद्या मिशन या संस्थेच्या वतीने  संपूर्ण महाराष्ट्रात सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना पठण करण्याचा  संकल्प केला आहे. संस्थेच्या सांगली केंद्रातर्फे दि ०७ जाने. २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल कराड येथे सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
माजी जि. प. सदस्या आशाताई विजय झिमुर यांनी शिराळा तालुक्यातील आपल्या मतदारसंघात विशेष काम केल्यामुळे तसेच मनस्वी ग्रुपच्या माध्यमातून मुंबई येथे महिलांसाठी विशेष कार्य करीत असल्याच्या कामाचा गौरव म्हणून आद. श्री. प्रल्हाद दादा यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी आशाताई झिमुर यांनी जीवन विद्या मिशनचे विशेष आभार मानले.
                               जाहिरात
    जीवनाचे खरे मूल्य कशामध्ये हे जीवन विद्या शिकवते. आद. श्री. प्रल्हाद दादांना वंदन व श्री. संतोष सावंत यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून माझा हा सन्मान मी सदगुरु चरणी अर्पण करते म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement