Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


स्टार्र प्रॉडकशनची सुरवात..ऑडिशन साठी कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद...


    " स्टार  प्रॉडक्शनची सुरूवात " .....  

      मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह -(संजय डुबल )
स्टार्र प्रॉडकशन, मुंबई च्या वतीने दोन लघुपटांची निर्मिती करण्यात येत असून सदर शॉर्ट फिल्म्स साठी कलाकार निवड करण्याचे उद्देशाने, दादर मुंबई येथील शारदाश्रम विद्यामंदिर येथे ऑडिशन संपन्न झाली. यावेळी सर्व वयोगटातील नवोदित कलाकारांसह अनेक अनुभवी कलाकारांनी उस्फुर्त प्रतिसाद देत आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण केले.
      ऑडिशन चे उदघाटन स्टार् प्रोडक्शनच्यां निर्मात्या ट्विंकल राजू भोसले यांच्या हस्ते स्क्रिप्ट पूजन करून  करण्यात आले. यावेळी लेखक दिग्दर्शक नाट्य समीक्षक सु. बा. सरपडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मनोगत व्यक्त करताना सरपडवळ यांनी सर्व टीम ला शुभेच्छा व्यक्त केल्या.
      निर्मात्या ट्विंकल राजु भोसले, दिग्दर्शक संजय डुबल, लेखक व गीतकार विजय कांबळे आदिनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. 
      या वेळी स्टार्र प्रॉडकशन च्या निर्मिती प्रमुख ट्विंकल भोसले, कथा व संवाद आरेखक व गीतकार विजय कांबळे, संगीतकार रुपेश खरात, शॉर्ट फिल्म चे दिग्दर्शक व कॅमेरामन संजय डूबल, स्टार्रर्र प्रॉडकशन चे समन्वयक माधुरी ऐवाळे,  सुभाष तोंडवळकर, साहिल रामटेके, सतीश पारकर, अतुल कारभारी आदींनी उपस्थित राहून ऑडिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.        उपस्थित मान्यवरांचे आभार  विजय कांबळे यांनी मानले.
                                    जाहिरात
                                  जाहिरात 
             











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement