Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


'शिवप्रताप' हे ऐतिहासिक नाटक व्यावसायिक रंगभूमीवर, यातील सर्वच्यासर्व पुरुष व्यक्तीरेखा या स्त्री कलावंतांनी साकारल्या आहेत. युवा उद्योजक श्री प्रवीण विनया विजय राणे यांची निर्मिती.

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल) :-  लालबाग चिंचपोकळी विभागातील प्रसिद्ध युवा उद्योजक श्री प्रवीण विनया विजय राणे यांची निर्मिती असलेलं 'शिवप्रताप' हे ऐतिहासिक नाटक नुकतच व्यावसायिक रंगभूमी वर दाखल झालेय. तब्बल 45 व्यक्तीरेखा असलेल्या या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्वच्यासर्व पुरुष व्यक्तीरेखा या स्त्री कलावंतांनी साकारल्या आहेत.
        स्वयंसिद्धी महिला मंडळ हे एक सांस्कृतिक मंडळ आहे आपल्या रूढी परंपरा जपणे आणि त्यापुढील पिढीपर्यंत पोहोचणे हे ध्येय घेऊन निर्माण केलेले महिलांचे मंडळ असल्याने आणि त्यासोबत महिला जर घर, ऑफिस त्याच सोबत देश चालवू शकतात तर रंगभूमीवर पुरुषपात्र  का साकारु शकत नाही? याच विचाराने या नाटकासाठी महिलांनीच पुढाकार घेत लेखिका श्रुती परब, दिग्दर्शक श्रुती परब व  नीलिमा खोत'  यांनी शिवप्रताप' या नाटकाच्या माध्यमातून त्यानी त्यांची एक  वेगळी ओळख निर्माण करण्याचे शिवधनुष्य उचलून यशस्वीपणे पेललं आहे. त्यांना साथ दिली ते निर्माते प्रवीण विनया विजय राणे यांनी.        स्वयंसिद्धी महिला मंडळातर्फे दरवर्षी 'श्री छत्रपती शिवाजी महाराजांना' मानवंदना म्हणून "शिवजयंती " निमित्ताने पोवाडा छोटेसे कथात्मक  नाटक , महाराजांच्या  इतिहासावर आधारित एकांकिका  अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी सादर करत. २०२३ मध्ये मानवंदना म्हणून " शिवप्रताप " हे हौशी रंगमंचावर दोन अंकी नाटक सादर केले आणि पाहता पाहता ते व्यावसायिक रंगभूमीवर आले.
-------------------------------------------------------------------------
                                 जाहिरात 
*संपूर्ण महाराष्ट्रात विभागवार वेलनेस सेंटर चालू करणे आहे.*

महिना लाखो रुपये कमावण्याची सुवर्ण संधी.

सर्व पँथी चे डॉक्टर्स,
अणि इतर कोणीही हे सेंटर चालऊ शकतात.

त्यासाठी कमीत कमी 250 चौ.फूट जागेची आवश्यकता

3000  प्रकारचे आजार बरे करण्याची क्षमता असणारे अत्याधुनिक मशीन 
(प्रत्येक आजाराचे वेगळे प्रोग्रॅम आहेत)

पेटंट प्रमाण पत्र
सरकारी प्रमाणपत्र
आयएसओ प्रमाणपत्र 
अणि अनेक प्रमाणपत्र सोबत मिळणार.
*(FDA, CDSCO, RoHS, NABL, CE, AND ISO-1345:2016)*

आजपर्यंत 5000 वर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

अनेक हॉस्पिटल्स चे क्लिनिकल ट्रायल रिपोर्टस.

डायबिटीस आजारावर एकाच तासात रक्तातील साखर कमी झाल्याचा रिझल्ट मिळतो.

कॉलेस्ट्रॉल देखील कमी झाल्याचे पाहता येईल .

अनेक आजार या मशीन मुळे बरे होतात कारण हे मशीन डायरेक्ट शरीरातील सेल्स वर काम करते.
शरीरातील रक्त प्यूरिफाय करते.
त्यामुळे अनेक आजार बरे होण्यास मदत होते.

संपर्क क्र:- *9833 82 92 32* 
*Delphine's Health Revitalize Pvt.Ltd.*
------------------------------------------------------------------------

   आम्ही जो उचललेला  वसा आहे तो आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तसेच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. महाराजांचा  इतिहास जो पुस्तकात वाचतो तो जिवंत स्वरूपात महिला रंगमंचावर साकारत आहेत आणि त्याकरिता एकीचे बळ असणे, एकमेकांची साथ आणि सोबत असणे गरजेचे आहे, तरच आपण केलेला अट्टाहास देशभरात पोहोचवायचा आहे. आपण सर्वांची आम्हाला सहकार्यांची अपेक्षा आहे ती म्हणजे आम्ही घेतलेला जो वसा आहे तो यशस्वीपणे सिद्धीस नेण्याकरिता आणि या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग सादर होण्याकरिता आपल्या सहकार्याची ......!
        30 मे 2024 रोजी जो प्रयोग  श्री शिवाजी  नाटय मंदिर दादर येथे  प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात आणि हरहर महादेव जयघोषात पार पडला, लेखक दिग्दर्शक व पत्रकार गणेश तळेकर यांचे सौजन्याने सदर प्रयोग संपन्न झाला.
                                   जाहिरात 

    या नाटकाच्या तांत्रिक बाजू सांभाळणारे एलईडी स्क्रीन बबलू तोडणकर, प्रकाशयोजना - अजय, संगीत - चारुदत्त घडशी, रंगभूषा - केदार ओटवणेकर
Av व्हिडिओ एडिटर / दिग्दर्शक - मनोज माळकर आणि गणेश तळेकर, व्यवस्थापन आणि बॅक स्टेज जबाबदारी मिलिंद सुर्वे पाहत आहेत.
                                 जाहिरात 

      या प्रयोगास चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव श्री वासुदेव सावंत, प्रसिद्ध मराठी व हिंदी जेष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांच्या कन्या डॉक्टर किशुपाल मॅडम , महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे, लावणी महासंघाच्या अध्यक्ष कविता घडशी, कार्यकारी निर्माता लेखक दिग्दर्शक अभिनेता गणेश तळेकर, धर्मवीर सिनेमा तील आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारलेले अभिनेते मकरंद पाध्ये , हिंदी मराठी अभिनेता राज पाटील , नाटय सिने अभिनेता पंकज गांगण , दिग्दर्शक रामदास तांबे , सांस्कृतिक कालादर्पण चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे , दिग्दर्शक विजय राणे, डॉ. हिंदुराव वायदंडे,आय आय टी मुंबई आणि आय आय टी गोवा चे माजी प्रमुख ग्रंथपाल,
मुंबई विद्यापीठ,सोमय्या युनिव्हर्सिटी चे युनिव्हर्सिटी लायब्ररीयन आणि ग्रंथालय विभाग प्रमुख श्रीधर चौघुले आदी मान्यवरांनी प्रयोगाला उपस्थिती लावली.
                               
      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement