शालेय प्रवेशासाठी दाखल्यांच्या वितरणासाठी पाटण महसूल प्रशासनाचा पुढाकार..
10 वी व 12 विचे निकाल नुकतेच जाहीर झाल्याने सध्या शालेय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कागदपत्राची जुळवा जुळव सुरू आहे.शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी सातारा यांनी मंडळ स्तरावर शिबिर घेऊन विद्यार्थ्यांना त्यांचे महसूल मंडळात च दाखला मिळेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तसेच अजूनही ज्या विद्यार्थ्यांना दाखले आवश्यक असतील त्याने त्यांचे शाळेचे किंवा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचे मार्फत स्थानिक महा ई सेवा केंद्र यांचेकडे कागदपत्र जमा करावीत म्हणजे त्यांना तत्परतेने दाखले देता येईल असे आवाहन प्रांताधिकारी व तहसीलदार पाटण यांनी केले आहे.
पाटण मंडळातील डखल्याचे शिबिर यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार पंडित पाटील, प्रभारी नायब तहसिलदार श्री विलास गभाले, तसेच तलाठी जयेश शिरोडे, प्रवीण होळकर, सुनील पाटील तसेच स्थानिक कोतवाल यांनी परिश्रम घेतले आहे.
पाटण तालुक्यातील महसूल प्रशासन हे विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी नेहमीच तत्पर असते.प्रसंगी कार्यालयीन वेळेनंतर किंवा सुटीच्या दिवशी देखील दाखले मिळतात. त्याबद्दल पाटण महसूल प्रशासनाचे एक पालक म्हणून खरोखर आभारी आहे.
.....पालक श्री सुभाष चव्हाण पाटण.


0 टिप्पण्या