Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे हस्ते जलाशयाचं जलपूजन संपन्न....

कोयनानगर :आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल )
शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सातारा जिह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे हस्ते महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखले जाणारे कोयना धरणातील पाण्याचे प्रथे प्रमाणे कोयना धरणात १०३. ४० टी.एम. सि. पाणीसाठा झाल्यावर जल पूजन व ओटीभरण कार्यक्रम पार पाडला. धरण भरल्याने सिंचन तसेच विद्युत निर्मिती चा प्रश्न मिटला आहे. 
     या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पाटण चे तहसीलदार अनंत गुरव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक संतोष रोकडे,कार्यकारी अभियंता निलेश पोदार,सहाय्यक अभियंता सागर पाटील, आशिष जाधव आदी मान्यवर मान्यवर उपस्थित होते.
     कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाच्या पाण्यातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे.
                कोयना धरण संग्राहीत छायाचित्र 

 दिनांक: ०१/०९/२०२४
 वेळ: सकाळी 08:00
 पाण्याची पातळी: २१६२'०५'' (६५९.१०५ मी) 
 
 धरण साठवण:
 एकूण: 103.84 TMC (98.66%)
 थेट: 98.72 TMC (98.59%)

 आवक : ५,८६१ क्युसेक.

 डिस्चार्ज
 रेडियल गेट: 00 क्युसेक.
 KDPH: 2,100 क्युसेक.

 कोयना नदीत एकूण विसर्ग: 2100 क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 
 कोयना- 17/4993
 नवजा- 25/5865
 महाबळेश्वर- ०७/५६५६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement