कोल्हापूर - दि. ८ : आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल) कोल्हापुर येथील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. रात्री दहा चे सुमारास ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
केशवराव भोसले नाट्यगृह
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कुस्ती मैदाना कडील बाजूस आगीच्या ज्वाला दिसून आल्या. नाट्यगृह इमारतीचे बहुतेक साहित्य लाकडाचे असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेले नसली तरी केशवराव भोसले नाट्यगृहाचा काही भाग कोसळला असून, छतही कोसळले आहे. केशवराव भोसले जयंतीच्या पूर्वसंध्येला नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे कोल्हापूरकर हळहळले आहेत.अग्नीशमन दलाच्या आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत.
आज शुक्रवारी (दि. 9) होणाऱ्या संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या 134 व्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडली आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, मात्र लागलेल्या आगीमुळे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

0 टिप्पण्या