Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान...मानवतेला समर्पित भावनेतून निरंकारी मिशनतर्फे कोथरूड येथे रक्तदान शिबिर संपन्न..

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान...

मानवतेला समर्पित भावनेतून निरंकारी मिशनतर्फे कोथरूड येथे रक्तदान शिबिर संपन्न...

पुणे- दि.६:-आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल ) 
             निरंकारी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने रविवार, ०६/१०/२०२४ रोजी संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिरांचे आयोजन शाखा  कोथरुड, झोन पुणे येथे करण्यात आले होते.यामध्ये २६९ संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी निस्वार्थीपणे रक्तदान केले.रक्त संकलनासाठी वाय सी एम रक्तपेढी आणि ससून हॉस्पिटल रक्तपेढी यांनी आपले योगदान दिले.
या शिबिराचे उद्घाटन श्री.चंद्रकांतदादा पाटील जी ( उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी संबोधित करताना त्यांनी निरंकारी मिशनच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.  
ADVT.

            संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे  उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता  यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी  भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
ADVT

            रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले. कोथरूड ब्रान्च प्रमुख श्री सुधीर वरघडे यांनी शिबिरामध्ये उपस्थित मान्यवरांचे तसेच रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement