Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


!! कुणी कुणाचे दैव जाणीले !!

!! कुणी कुणाचे दैव जाणीले  !!

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - जन्म-मृत्यु हे कुणाला ठावे नाही  ! आपल्या तर अजिबात हातात नाही.... पण जीवन जगताना आपल्याला बर्याच गोष्टींच पालन करावे लागते करण जन्म दिला त्या आई- वडीलांना आणि भावंडांना सांभाळणे अर्थात त्यांना समजून घेणे आवश्यक आहे ! ते आपलं एक कर्तव्यच असत  ! नंतर उमेदीच्या काळात मित्र- मैत्रीणी त्या नंतर जमलेच तर एखादी प्रेयसी! आणि प्रेमातून टिकलच तर मग लग्न करून बायको हे मानव रूपी संसार चक्र सुरू होत ते वृध्दापकाळा पर्यंत.... कोण कुणाला जिवनात किती काळ साथ देईल हे ठावे नसते तरी पण आपण वेड्या आशेवर जगत असतोच! कारण मानवाचा मोह उसळत्या लाटांसारखा असतो... अन् एक दिवस अचानक निघून जातो कुडीतला आत्मा! पाण्याच्या बुडबुड्या सारखा  ! चार खांदेकरांच्या खांद्यावरून..... जय राम श्री राम ऽऽऽ जय राम श्रीरामच्या जय घोषात अंतिम प्रवासाला निघतो..... अशी जन्म- मृत्यूनंतर योग यात्रा संपते! म्हणून त्याला प्रेतयात्रा म्हणतात. 
कवी - कै. मंगेश कुलकर्णी आणि अरूण घाडीगावकर ( लोकप्रिय साहित्यिक ) आमचे खास मित्र.....
जीवन गौरव पुरस्कार घेताना - कै. कवी  मंगेश कुलकर्णी  आणि इत्यादी...
     सांगायचे तात्पर्य काय तर जन्मास आपण आलो आहोत तर एक ना एक दिवस जाणे हे निश्चित आहे  ! हे ना कुणा चुके ! अर्थात.... कुणी कुणाचे दैव जाणीले  ? 
                       🌷🌷आदरांजली 🌷🌷
     मागील महिन्यात काय झाले आहे कुणास ठावे ! एका महिन्यात माझ्या मित्र ग्रूपमधे अन् स्नेही परिवारात पांच देह कैलासवासी झाले. 
               कवयित्री - संगीता काळभोर अन् आई
       ऑक्टोबर २०२४ ला आमच्या मानस भगिनी कवयित्री- संगीता काळभोर यांच्या मातोश्री श्रीमती- कै. रत्नाबाई माने यांचे दिनांक - ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने अचानक निधन झाले तर भारताचे कुशल उद्योगपती - श्रीमान रतन टाटा साहेब गमावले ! टाटा नीं भारतासाठी अनेक उद्योग निर्माण केले आणि आज भारतामध्ये कोट्यावधी लोक आपले पोट पाणी भरत आहेत हे टाटा समुहाचे कार्य भारताला कधीच विसरता येणार नाही ! एवढं महान कर्तब त्यांनी करून ठेवले आहे.
हौशी रंगभूमीवरचे नट, 
नाटककार - अण्णासाहेब  (ममना ) नाईक यांच्या चिरंजीवांचे कौतुक करताना रतनजी टाटा.....
        अनेक सिरीयल, सिनेमा यशस्वी नाटकांचे लेखक, आमचे मित्र नाटककार - कै. आनंद म्हसवेकर हे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी अचानकपणे मृत्यूस पावले न पावले तोच आमचा लोकप्रिय हरहुन्नरी अभिनेता- अतुल परचुरे दिनांक- १४ ऑक्टोबर २०२४ ला  कैलासवासी झाला तर माझी चुलत चुलती - कै. अलका पडवळ हिचे १६ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले .हे दु:ख सरते नसते एवढ्यात आमचा कवी मित्र " मोरूची मावशी " या नाटकाची गाणी लोकप्रिय करणारा गीतकार ( फेमस गाणे ) टांगटींग टिंगाक टां.... आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा.... ढूम....गाण्याचे रचनाकार - कवी कै. मंगेश कुलकर्णी १९ ऑक्टोबर २०२४ रोजी आमाला  सोडून गेला  ! मंगेश चे कला कार्य सांगायचे म्हटले तर एखादी कादंबरीच लिहावी लागेल ! इतके मोठे त्याचे लेखन / दिग्दर्शन आणि अभिनय सुध्दा रंगभूमीला प्राप्त झालेले कार्य आहे. 
       हे दु:ख आम्ही आणि रसिकांनी कसे सहन करावे बरे  ? मंगेश कुलकर्णी यांनी अनेक मित्रमैत्रिणी जोडले आहेत , त्यातला मी  एक मित्र! आज काव्यमैफीलीतला सुर   हरवल्याची प्रचंड जाणीव होत आहे.... ! 
.           थोर साहित्यिक, हास्य संगित दरबारातील कुशल नटसम्राट -   पु. ल. देशपांडे, कलावंतांच्या घोळक्यात दिपक तावडे, अभिनेता - रवींद्र बेर्डे, अभिनेत्री - मालतीबाई पेंढारकर, दिग्दर्शक - चंद्रकांत कुलकर्णी आणि अतुल परचुरे ..... व्यक्ती आणि वल्ली नाटकाच्या तालमीच्या वेळीच्या आनंदी प्रसंगात रममाण झालेले सर्वजण.
            आमच्या कैलासवासी सर्व व्यक्तींच्या आत्म्याला शांती दे हिच परमेश्वरा तुला हात जोडून प्रार्थना  ! 🙏आणि " आदरांजली
            छायाचित्र संशोधन - संजय डुबल आणि 
              नाट्यसमीक्षक - सु. बा. सरपडवळ 
                   मो. नं. - ९१६७५८९१५२.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement